रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर नोगोठणे, कोलेटी वाडी येथील पेंट्रोल पंपावर बर्निग कारचा थरार नागरिकांना पाहायला मिळाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार जळून खाक झाली आहे. पेट्रोल पंपातून कार बाहेर काढल्याने मोठी दुर्घटनाही टळली आहे. रविवारी दुपारच्या सुमारसही घटना घडली.
पेट्रोल पंपावरून बाहेर काढली कार-
खेड येथील रुपेश म्हात्रे हे दोन मित्रांसोबत खेड त्यांच्या दोन मित्रासोबत मुंबईकडे निघाले होते. प्रवासादरम्यान म्हात्रे यांच्या कारचे इंजीन गरम होऊ लागले. त्यामुळे त्यांनी महामार्गावर गॅरेजचा शोध सुरू करत प्रवास सुरूच ठेवला. त्यांची कार नागोठणे कोलेटी वाडी येथील पेट्रोल पंपावर थांबवली आणि मेकॅनिकची चौकशी सुरू केली. त्यावेळी त्यांच्या कारला खालच्या बाजुने आग लागली. हे लक्षात येताच रुपेश म्हात्रे आणि त्याच्या दोन मित्रांना कार बाहेर काढले आणि ती कार तत्काळ पंपाच्या बाहेर सोडली.