ETV Bharat / state

अलिबाग रेवस मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू - raigad accident news

जेएसडब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस सकाळी अलिबागवरून रेवसकडे निघाली होती. तर केसरीनाथ पाटील हे रेवसकडून आपल्या दुचाकीवरून अलिबागकडे येत होते. पावणे दहाच्या सुमारास पाटील हे विद्यासागर चेंढरे परिसरातील रॉयल मोटर्स येथे आले असता समोरून येणाऱ्या जेएसडब्लू बसची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अलिबाग रेवस मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा मृ्त्यू

author img

By

Published : Apr 25, 2020, 12:17 PM IST

Updated : Apr 25, 2020, 2:42 PM IST

रायगड - अलिबाग रेवस मार्गावर जेएसडब्लू बस आणि दुचाकीचा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. विद्यानगर चेंढरे येथे आज (शनिवारी) सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. केसरीनाथ पाटील (वय - 62 रा. खिडकी) असे मृताचे नाव आहे.

जेएसडब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस सकाळी अलिबागवरून रेवसकडे निघाली होती. तर केसरीनाथ पाटील हे रेवसकडून आपल्या दुचाकीवरून अलिबागकडे येत होते. पावणे दहाच्या सुमारास पाटील हे विद्यासागर चेंढरे परिसरातील रॉयल मोटर्स येथे आले असता समोरून येणाऱ्या जेएसडब्लू बसची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृत केसरीनाथ पाटील यांचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. तर पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे नवे 357 रुग्ण; 11 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्णांची संख्या 4589 वर

Last Updated : Apr 25, 2020, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.