ETV Bharat / state

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा गावदौरा जोरात

सर्वच राजकीय पक्षांनी तोडीस तोड उमेदवार दिल्याने शेकापकडे जाणारी स्थानिक ग्रामस्थांची पारंपरिक मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. तसेच शेकापचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या पनवेल मतदारसंघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी सुरुंग लावून इतिहास घडविला होता. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या गावांना न विसरता शेकापचे बीज रोवलेल्या गावागावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत.

भाजप पनवेल उमेदवार प्रशांत ठाकूर
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:52 AM IST

पनवेल - गेल्या 10 वर्षांपासून असलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणूकीत उतरले आहेत. येथील शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागाला ही प्रवाहात आणण्यासाठी भाजप आमदार ठाकूर यांचा गावदौरा जोरात सुरू आहे. ते प्रत्येक गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना दिसून येत आहेत. निवडणूकांना काही दिवसांचा कालावधी उरल्याने आमदार ठाकूर यांचे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे, प्रचार फेऱ्यांवर भर देत भरगच्च कार्यक्रम ठरलेले आहेत. यासाठी भाजचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून गावे, शहरे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत.

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचा गावदौरा जोरात

हेही वाचा - 'मोदीच काय ट्रम्प जरी परळीत आणला तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही'

सर्वच राजकीय पक्षांनी तोडीस तोड उमेदवार दिल्याने शेकापकडे जाणारी स्थानिक ग्रामस्थांची पारंपरिक मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. तसेच शेकापचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या पनवेल मतदारसंघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी सुरुंग लावून इतिहास घडविला होता. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या गावांना न विसरता शेकापचे बीज रोवलेल्या गावागावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत.

हेही वाचा - 'कलम 370 निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही?'

त्यामुळे पनवेलमध्ये होणाऱ्या बहुरंगी लढतीत खरी लढत ही भाजपचे प्रशांत ठाकूर व शेकापचे हरेश केणी या दोन उमेदवारांमध्येच होणार आहे. म्हणून मुंबईचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या पनवेलवर कब्जा कुणाचा राहणार याबाबत पनवेलकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

पनवेल

गेल्या 10 वर्षांपासून पनवेलवर साम्राज्य निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणूक उतरले आहेत. पनवेलच्या शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागाला ही प्रवाहात आणण्यासाठी मैदानात उतरलेले भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा गावदौरा जोरात सुरू असून प्रत्येक गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना दिसून येत आहेत. निवडणूकांना काही दिवसांचा कालावधी उरल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक दिवसाचा 'इलेक्शन प्लॅन' तयार केला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे, प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे.आपल्या नेत्याला जिंकून आणण्यासाठी भाजपचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून गावे, शहरे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत.Body:सर्वच राजकीय पक्षांनी तोडीस तोड उमेदवार दिल्याने शेकापकडे जाणारी स्थानिक ग्रामस्थांची पारंपरिक मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपच्या प्रशांत ठाकूर यांना मिळणार असल्याचे बोलले जाते.
शेकापक्षाचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या पनवेल मतदारसंघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांनी सुरुंग लावून इतिहास घडविला होता. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या गावांना न विसरता शेकापचं बीज रोवलेल्या गावागावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत.

Conclusion:त्यामुळे पनवेलमध्ये होणाऱ्या बहुरंगी लढतीत खरी लढत ही भाजपचे प्रशांत ठाकूर व शेकापचे हरेश केणी या दोन उमेदवारांमध्येच होणार असून मुंबईचे प्रावेशद्वार मानले जाणाऱ्या पनवेलवर कब्जा कुणाचा राहणार याबाबत पनवेलकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.