ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष - मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
author img

By

Published : Nov 23, 2019, 12:26 PM IST

पनवेल - देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरत हा जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

हेही वाचा- सरकार स्थापनेमध्ये शरद पवारांचा सहभाग - सूत्र

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना आज सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं म्हणून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी नंतर पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जमा होऊन हा आनंद साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करून आणि ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत आमदार प्रशांत ठाकूर यांनाही हा आनंद आवरला नाही. दरम्यान ढोल ताशांच्या गजरावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मात्र, भाजप कार्यकर्त्यांसह हातात भाजपचा झेंडा घेऊन ढोल ताशाच्या गजरात काही काळ नाचण्याचा आनंद लुटला.

Intro:सोबत व्हिडीओ जोडला आहे

पनवेल

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर ठेका धरत हा जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. Body:देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना आज सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र निर्माण झालं. पण राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आलं म्हणून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी नंतर पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या समोर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जमा होऊन हा आनंद साजरा केला.Conclusion:फटाक्यांची आतषबाजी करून आणि ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत आमदार प्रशांत ठाकूर यांनाही हा आनंद आवरला नाही. दरम्यान ढोल ताशांच्या गजरावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मात्र भाजप कार्यकर्त्यांसह हातात भाजपचा झेंडा घेऊन ढोल ताशाच्या गजरात काही काळ नाचण्याचा आनंद लुटला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.