ETV Bharat / state

शिवसेनेकडून महेंद्र दळवी तर भाजपकडून अॅड महेश मोहिते यांची भावी आमदार म्हणून बॅनरबाजी - Mahendra Dalvi

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पडघम वाजायला सुरुवात झाली. त्यानुसार अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप दोघेही पक्षाची बांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. यावेळी दोन्ही पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांची सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू आहे.

हेच ते बॅनर
author img

By

Published : Jul 29, 2019, 1:28 PM IST

रायगड- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता. मात्र युतीने विरोधकांना मताधिक्यात रोखले. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी भगवा फडकेल असे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना व भाजपकडून आमदारकीसाठी दावेदारी सुरू झाली आहे. याबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांची सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पडघम वाजायला सुरुवात झाली. त्यानुसार अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप दोघेही पक्षाची बांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र दळवी हे बारा हजार मताने या मतदारसंघातून पराभूत झाले होते. तर शेकापचे पंडित पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.

यानंतर पाच वर्षात शिवसेना व भाजप यांनी या मतदार क्षेत्रात पक्ष मजबूत करण्यास सुरुवात केली. २०१४ साली शिवसेना या मतदारसंघात दुसऱ्या नंबरवर होती. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. महेंद्र दळवी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची धुरा दिली आहे. त्यामुळे दळवी हे पुन्हा एकदा आमदारकीचे दावेदार असून त्यादृष्टीने त्यांनी सुरुवातही केली आहे. मात्र, पक्षाकडून अजून शिवसेनेचा उमेदवार कोण हे जाहीर झालेले नाही. तरीही पक्षाकडून सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर बॅनरबाजी करण्यात भाजपही मागे नाही

भाजप सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे मागण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र तुर्तास तरी याबाबत वरिष्ठ पातळीवरून बोलणी सुरू झालेली नाही. मात्र भाजपकडून अॅड. महेश मोहिते यांना आमदारकीची उमेदवारी मिळू शकते असे वातावरण आहे. अॅड. मोहिते यांचे सुद्धा भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू आहे.

Intro:
अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप यांची उमेदवारी आधीच सोशल मीडियावर बॅनर बाजी

शिवसेनेकडून महेंद्र दळवी तर भाजपकडून अड महेश मोहिते याची भावी आमदार म्हणून बॅनरबाजी

रायगड : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला असला तरी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात युतीने विरोधकांना मताधिक्यात रोखले आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात यावेळी भगवा फडकेल असे वातावरण निर्माण झाले असले तरी शिवसेना व भाजप कडून आमदारकी साठी दावेदारी सुरू झाली असून भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघावर युतीतील कोणता मित्र बाजी मारणार हे लवकरच समोर येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पडघम वाजायला सुरुवात झाली असून अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप हे मित्रपक्ष पक्षाची बांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र दळवी हे बारा हजार मताने पराभूत झाले होते. तर शेकापचे पंडित पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. Body:पाच वर्षात शिवसेना व भाजप यांनी पक्ष मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना हा 2014 मध्ये दुसऱ्या नंबरवर राहिला असल्याने हा मतदार संघ शिवसेनेकडे राहील असे चित्र आहे. महेंद्र दळवी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची धुरा खांद्यावर दिली आहे. त्यामुळे महेंद्र दळवी हे पुन्हा एकदा आमदारकीचे दावेदार असून त्यादृष्टीने दळवी यांनी सुरुवात केली आहे. पक्षाकडून अजून शिवसेनेचा उमेदवार कोण हे जाहीर केलेले नाही. मात्र सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सुरू केली आहे. Conclusion:भाजप पक्ष हा सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात अड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे मागण्याचा प्रयत्न करेल. मात्र तूर्तास तरी याबाबत वरिष्ठ पातळीवरून बोलणी सुरू झालेली नाहीत. मात्र भाजपकडून अड. महेश मोहिते याना आमदारकीची उमेदवारी मिळू शकते असे वातावरण आहे. अड. महेश मोहिते यांचे सुद्धा भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सोशल मीडियावर सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीला अजून दोन ते तीन महिने उरले असताना अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना व भाजप या मित्र पक्षाकडून भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.