पेण (रायगड) - पेण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास आपल्या मनात असल्याने परिसरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. यापुढेही रावे गावाला निधी कमी पडू देणार नसल्याचे भाजपा आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले आहे. विविध विकास कामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
पेण तालुक्यापासून अल्पित असणारा रावे गाव अनेक विकासापासून वंचित राहिला होता. मात्र आपण पहिल्यांदा मंत्री झालो आणि या गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. अनेक योजना गावासाठी राबविल्या आणि आता नुसता आमदार असूनही जवळपास दोन कोटींच्यावर विकासात्मक कामे करण्याचे ध्येय आपल्या मनात असल्याची भावनाही आमदारांनी बोलून दाखविली. रावे गावातील जल जीवन मिशन अंतर्गत रावे, खोकरी, कासू मोरा, कोटा, पाणीपुरवठा योजना ८४ लाख, जेएसडब्ल्यु सीएसआर फंड तलाव सुशोभीकरण यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पार पडले.