ETV Bharat / state

बंगाल आणि जगाने विदूषक कोण हे दाखविले आहे.. शेलारांच्या टीकेला पटोलेंचे प्रत्युत्तर

देशात विदूषक कोण हे पश्चिम बंगालने दाखविले असून जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे विदूषक कोण आणि हिरो कोण, हे जनताच ठरवणार आहे. असे सणसणीत उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार आशिष शेलार याच्या टीकेला दिले आहे.

nana patole
nana patole
author img

By

Published : May 22, 2021, 3:09 PM IST

Updated : May 22, 2021, 3:24 PM IST

रायगड - देशात विदूषक कोण हे पश्चिम बंगालने दाखविले असून जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे विदूषक कोण आणि हिरो कोण, हे जनताच ठरवणार आहे. असे सणसणीत उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार आशिष शेलार याच्या टीकेला दिले आहे. आशिष शेलार हा विदूषक कंपनीतील छोटा कार्यकर्ता असून त्याच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अलिबाग येथे तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले होते. पाहणी दौऱ्यानंतर अलिबाग काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई येथे आमदार आशिष शेलार यांनी नाना पटोले याच्यावर केलेल्या टीकेबाबत पटोले यांनी सणसणीत उत्तर दिले.

नाना पटोले आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना
आशिष शेलार यांनी विदूषक म्हणून केली होती टीका -
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विदूषक असल्याची टीका केली होती. यावरून आशिष शेलार आणि नाना पटोले यांच्यात शाब्दिक द्वंध पेटले. आशिष शेलारच्या टीकेला नाना पटोले यांनी अलिबाग येथे उत्तर दिले आहे.
बंगाल आणि जगाने दाखविले विदूषक कोण आहे -
आशिष शेलार यांनी नाना पटोले याना विदूषक म्हणून टीका केली आहे. याबाबत नाना पटोले यांनी अलिबाग येथे आले असता घेतलेल्या पत्रकार परिषदेत आशिष शेलार याच्या टीकेला उत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत जनतेने विदूषक कोण हे दाखवून दिले आहे. तर नुकताच जगात कोरोना काळात भक्कम पंतप्रधान कोण याबाबत सर्व्हे झाला असून यात भारताच्या पंतप्रधानांचे नाव नाही. त्यामुळे खरे विदूषक कोण हे जनतेला कळले आहे. त्यामुळे जनताच आगामी काळात कोण हिरो आणि कोण विदूषक हे दाखवून देईल. त्यामुळे विदूषक कंपनीतील आशिष शेलार हे छोटा कार्यकर्ता आहेत. त्यामुळे त्याच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, असा टोला आशिष शेलार आणि भाजपला लगावला आहे.

Last Updated : May 22, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.