रायगड - मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर देशात लॉकडाऊन लागले होते. कोरोनामुळे सरकारने गर्दीची सर्व ठिकाणे नागरिकांना, पर्यटकांना बंद केली होती. यामध्ये बार अँड रेस्टॉरंटही बंद झाली होती. साडेसहा महिन्यानंतर पुन्हा सरकारने 5 ऑक्टोबरपासून बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील बार अँड रेस्टॉरंट ही आजपासून नियमानुसार सुरू झाली असून मद्यपी आणि जेवण करण्यास येणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील बार अँड रेस्टॉरंट कोरोनाचे नियम पाळून सुरू - raigad hotel bar start latest news
साडेसहा महिन्यानंतर बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर पुन्हा ग्राहकांची पावले मद्य पिण्यास आणि जेवण करण्यास वळली आहेत. ग्राहकांनाही नियमाचे पालन केल्यानंतरच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. बार सुरू झाल्याने पुन्हा मित्रांच्या मैफिली रंगणार असल्या तरी कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. हे ग्राहकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.