ETV Bharat / state

विठूरायाच्या गजरात बाल वारकरी दंग, बालदिंडी काढून घेतले विठुरायाचे दर्शन - री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर

अलिबाग मधील प्रति पंढरपूर असलेले वरसोली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आज बच्चे कंपनी बालदिंडी घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेली होती. रखुमाई, वासुदेव, वारकरी वेशभूषेत आलेल्या लहान मुलांच्या बालदिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अलिबाग मध्ये लहान मुलांच्या बालदिंडीचे आयोजन
author img

By

Published : Jul 12, 2019, 5:32 PM IST

रायगड - आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी पंढरपुरी जात असतात. अलिबाग वरसोली येथील आंग्रे कालीन प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिर अतिशय पुरातन आहे. रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली या भागातील वारकरी दिंड्या घेऊन येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र यावर्षी विठ्ठल, रखुमाई, वासुदेव, वारकरी वेशभूषेत आलेल्या लहान मुलांच्या बालदिंडीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अलिबाग मध्ये लहान मुलांच्या बालदिंडीचे आयोजन

विठुरायाच्या दर्शनाची आस मोठ्यांना लागली होती तशी या बच्चे कंपनीलाही होती. यामुळे अलिबाग शहरातील किडज या शाळेतील विद्यार्थी बालकांची बालदिंडी यावेळी काढण्यात आली होती. विठ्ठल रखुमाई, वासुदेव, वारकरी तसेच टाळ, वीणा अशा वेशभूषेत आलेल्या या बालदिंडीने विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी या बालदिंडीतील या गोंडस मुलाचे फोटो काढण्याचा मोह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवरता आला नाही.

bal-dindi-in-raigad-alibagh

Intro:

बाल गोपाळानी बालदिंडी काढून घेतले विठुरायाचे दर्शन

विठ्ठल रखुमाई, वासुदेव, वारकरी वेशभूषेत बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

रायगड : आषाढी एकादशीनिमित्त मोठ्यापासून लहानग्या पर्यंत सर्व विठ्ठल भक्तांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिली होती. अलिबाग वरसोली येथील प्रति पंढरपूर असलेले श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विठुरायाच्या दर्शनाची आस मोठ्यांना लागली होती तशी बच्चे कंपनीही बालदिंडी काढून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलेली होती. बाल वारकऱ्यांची आलेली ही बालदिंडी पाहून अनेकांना त्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.

Body:अलिबाग वरसोली येथील आंग्रे कालीन प्रति पंढरपूर समजले जाणारे श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई पुरातन मंदिर आहे. आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे काकड आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर भाविकांची रीघ विठूरायांच्या दर्शनासाठी सुरू झाली. रेवस, बोडणी, नवगाव, वरसोली येथून वारकरी दिंड्या घेऊन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत होते. तर यामध्ये बाल गोपाळ वारकरी हे सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी वेशभूषेमध्ये आले होते.

Conclusion:अलिबाग शहरातील किडज या शाळेतील नर्सरीची मुले मुले विठ्ठल रखुमाई, वासुदेव, वारकरी या वेशभूषेत दिंडी घेऊन विठ्ठल मंदिरात आली होती. बाल वारकऱ्याची आलेली ही दिंडी सगळ्याचे आकर्षण ठरली होती. विठ्ठल रखुमाई, वासुदेव, वारकरी तसेच टाळ, वीणा अशा वेशभूषेत आलेल्या या बालदिंडीने विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी या बालदिंडीतील या गोंडस मुलाचे फोटो काढण्याचा मोह दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आवरता आला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.