रायगड - बाईक चालवताना अनेक वेळा अपघातानंतर हेल्मेट नसल्याने बाईक चालकाचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. रस्त्यावर बाईक चालवताना हेल्मेट घालणे गरजेचे असून त्यामुळे आपला जीव सुरक्षित राहतो आणि कुटूंबही आनंदित राहते, असा संदेश बाईक रॅलीच्या माध्यमातून जनजागृतीद्वारे सीआयएसएफ जवानांनी अलिबागकरांना दिला आहे.
नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचा रॅलीला हिरवा झेंडा
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अलिबाग थळ येथील आरसीएफ कंपनीतील सीआयएसएफ युनिटतर्फे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार रास्ता सुरक्षा अभियान मोहीम हाती घेतली आहे. आरसीएफ कॉलनी गेट समोरून सीआयएसएफ जवानांनी बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सुरक्षा बल युनिट कमांडर औदेश प्रसाद, असिस्टंट कमांडर गुरमित सिंग, महेश सावंत, सीआयएसएफ जवान सहभागी झाले होते.
![सीआयएसएफ जवानांची बाईक रॅलीतून जनजागृती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rai-02-baikrally-slug-7203760_03022021184832_0302f_02973_401.jpg)
हेही वाचा - फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप