ETV Bharat / state

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यासोबत वाचवणारा पोलीसही जखमी

नवी मुंबई पोलिस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, संबंधित युवक आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा शिघ्र कृती दलाचा पोलीस, असे दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत. योगेश चांदणे ( वय 30) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातला आहे.

पोलीस मुख्यालय
author img

By

Published : Jun 22, 2019, 6:15 PM IST

रायगड - नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, संबंधित युवक आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा शिघ्र कृती दलाचा पोलीस, असे दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत.

योगेश चांदणे ( वय 30) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातला आहे. योगेश सकाळी 10 च्या सुमारास कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला. तेथून मी आत्महत्या करतो, असे ओरडत होता.

हे कळल्यानंतर ताबडतोब कळंबोली पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस इमारतीच्या गच्चीवर त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र पोलिसांना पाहून तो आणखी कावराबावरा झाला.

दरम्यान खाली, इमारतीवरून उडी मारणाऱ्याची धमकी देणाऱ्या योगेशला झेलण्यासाठी पोलिसांनी कापडाच्या झोळ्या तयार केल्या. मदतीसाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

पोलीस मुख्यालय
एक पोलीस पाण्याच्या टाकीवर चढून योगेशला समजावत होते. दरम्यान शिघ्र कृती दलाचे पोलीस स्वप्निल मंडलिक यांनी योगेशला मागून झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र योगेशने टाकीच्या काठाकडे झेप घेतली.

त्यामुळे योगेश आणि स्वप्निल दोघेही टाकीवरून ७ फूट खाली पडून जखमी झाले आहेत. दरम्यान दोघांनाही कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
योगेश हा नैराश्याने ग्रस्त आहे. त्यामुळे नैराश्यातून तो आत्महत्या करणार होता, अशी माहिती आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे पोलीस स्वप्निल मंडलिक यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Intro:बातमीला व्हिडीओ सीबत जोडला आहे.

पनवेल

कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून हा तरुण उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. तिथल्याच एका पोलिस अधिका-याने स्वतःचा जीव धोक्यात घालून चौथ्या मजली इमारतीवर असलेल्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. यात तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले असून तरुणाचा जीव वाचवणारा पोलीस मात्र जखमी झाला आहे. Body:योगेश चांदणे असे या तरुणाचे नाव असून तो 30 वर्षाचा आहे. मूळचा बीड जिल्ह्यातला असून त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.सकाळी 10 च्या सुमारास कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला आणि मी आत्मह्त्या करतो, असे ओरडत होता. हे कळल्यानंतर ताबडतोब कळंबोली पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस इमारतीच्या टेरेसवर त्याला वाचवण्यासाठी गेले.
पोलिसांना पाहून तो आणखी कावराबावरा होऊन इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. हे दृश्य इमारतीखाली उभे असलेले लोक पाहत होते आणि त्याने जर खाली उडी मारली तर त्याला झेलण्यासाठी कापडाच्या झोळ्या तयार केल्या होत्या. मदतीसाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

एक पोलीस पाण्याच्या टाकीवर चढून योगेशला समजावत असतांना स्वप्निल मंडलिक हा पोलीस योगेशच्या मागून आला आणि झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण योगेशने टाकीच्या काठाकडे झेप घेतली. त्यामुळे तो आणि त्याला पकडणारापोलीस स्वप्निल हे दोघेही टाकीवरून ७ फूट खाली पडून जखमी झालेत. दोघांनाही कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
योगेश हा नैराश्याने ग्रस्त आहे. या निराशेमुळे तो आत्महत्या करणार होता, असे कळते.Conclusion:आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे पोलीस स्वप्नील मंडलिक यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.