ETV Bharat / state

अलिबागकरांनी अनुभवली शनि आणि गुरूची युती, 800 वर्षांनंतरचा दुर्मीळ योग - Saturn Planet news

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तब्बल 800 वर्षांनी हे दोन ग्रह एकत्र आले आहेत.

Alibag
Alibag
author img

By

Published : Dec 20, 2020, 2:47 PM IST

Updated : Dec 20, 2020, 3:12 PM IST

रायगड - सूर्यमालेतील गुरू आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आले आहेत. या दोन ग्रहांची दुर्मीळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तब्बल 800 वर्षांनी हे दोन ग्रह एकत्र आले आहेत.

खगोल शास्त्रज्ञ आणि आकाश निरीक्षक यांनी केले मार्गदर्शन

खगोल शास्त्रज्ञ एस. नटराजन व अलिबागमधील आकाश निरीक्षक प्राध्यापक राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीतून हा योग अनुभवण्यासाठी लहान थोर अलिबागकरांनी गर्दी केली होती. यात शालेय विद्यार्थ्याची संख्या लक्षणीय होती. आकाश दर्शनाबरोबर खगोल विज्ञानाची आणि आकाशातील ग्रहताऱ्याची माहितीदेखील यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

अलिबाग समुद्र किनाऱ्यावरून पाहिली शनी आणि गुरुची युती

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर समितीमार्फत अलिबाग समुद्रकिनारी दोन दिवस शनी आणि गुरू एकाच रेषेत आल्याचा अनुभव अलिबागकरांनी अनुभवला. गुरू शनी हे दोन ग्रह 800 वर्षांनंतर एकाच रेषेत आले आहेत. त्यामुळे ग्रहांचा हा योग पाहण्याची संधी अलिबागकरांना अनुभवला मिळाली. यासाठी जे एस. एम. कॉलेजच्या मागील समुद्रकिनारी दुर्बिणीद्वारे ग्रह पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. असा ग्रहांचा योग पहिल्यांदाच पाहण्यास मिळाल्याने विद्यार्थीही आनंदित होती.

Last Updated : Dec 20, 2020, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.