ETV Bharat / state

अलिबागमधून काँग्रेसच्या अ‌ॅड श्रद्धा ठाकूर, राजेंद्र ठाकूर दोघेही रिंगणात

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकाच घरातील दोन सदस्यांना एबी फॉर्म दिले आहेत. या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत.

author img

By

Published : Oct 4, 2019, 5:31 PM IST

Updated : Oct 4, 2019, 8:39 PM IST

अलिबाग मतदारसंघ

रायगड - अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अ‌ॅड. श्रद्धा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्याकडे सादर केला. 3 ऑक्टोबरला काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनीही आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरलेला आहे. तसेच श्रद्धा ठाकूर यांनाही पक्षाकडून एबी अर्ज दिला गेला आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. श्रद्धा ठाकूर यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरताना तालुक्यातील पहिल्या फळीच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येण्याचे टाळले होते. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील कोण अर्ज मागे घेणार की दोन्ही उमेदवार निवडणूक लढविणार, हे सात तारखेला कळणार आहे. मात्र, तूर्तास तरी काँग्रेसमधील अंतर्गत कुरखोडी समोर आलेली आहे.

ऍड. श्रद्धा ठाकूर व राजेंद्र ठाकूर दोघेही रिंगणात

जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापची आघाडी आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापचे पंडित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आघाडी असूनही काँग्रेस पक्षाने अलिबाग विधानसभा मतदारसंघातून अ‌ॅड. श्रद्धा ठाकूर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली असतानाही राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र ठाकूर यांनी 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करताना अलिबाग तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे राजेंद्र ठाकूर हेच पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र तयार झाले होते. राजेंद्र ठाकूर हे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र आहे,

तर अ‌ॅड. श्रद्धा ठाकूर या सून आहेत. ठाकूर कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांसमोर उमेदवार म्हणून उभे राहिले असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समोर नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रद्धा ठाकूर यांच्या सोबत राहायचे की राजेंद्र ठाकूर यांना मदत करायची अशी द्विधा मनस्थिती काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची झाली आहे.

Intro:
अलिबागमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऍड श्रद्धा ठाकूर यांनी भरला उमेदवारी अर्ज

अलिबागमधून काँग्रेसचे ऍड. श्रद्धा ठाकूर व राजेंद्र ठाकूर दोघेही रिंगणात

कार्यकर्ते संभ्रमात

रायगड : अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून आज काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ऍड. श्रद्धा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्याकडे सादर केला. 3 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनीही आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरलेला आहे. श्रद्धा ठाकूर यांना पक्षाकडून एबी अर्ज दिला गेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. आज श्रद्धा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज भरताना तालुक्यातील पहिल्या फळीच्या पक्षाच्या पदाधिकारी यांनी येण्याचे टाळले होते. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील कोण अर्ज मागे घेणार की दोन्ही उमेदवार निवडणूक लढविणार हे सात तारखेला कळणार आहे. मात्र तूर्तास तरी काँग्रेसमधील अंतर्गत कुरखोडी समोर आलेली आहे.

Body:जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापचे पंडित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आघाडी असूनही काँग्रेस पक्षाने अलिबाग विधानसभा मतदारसंघातून ऍड. श्रद्धा ठाकूर याना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली असतानाही राजेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.Conclusion:राजेंद्र ठाकूर यांनी 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना अलिबाग तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे राजेंद्र ठाकूर हेच पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र तयार झाले होते. मात्र आज ऍड. श्रद्धा ठाकूर यांनीही अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने पक्षाची अंतर्गत कुरखोडी समोर आली आहे.

राजेंद्र ठाकूर हे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र तर ऍड श्रद्धा ठाकूर या सून आहेत. ठाकूर कुटूंबातील दोन सदस्य उमेदवार म्हणून उभे राहिले असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समोर नवा पेच समोर उभा राहिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऍड. श्रद्धा ठाकूर यांच्या सोबत राहायचं की राजेंद्र ठाकूर यांना मदत करायची अशी द्विधा मनस्थिती काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांची झाली आहे.
Last Updated : Oct 4, 2019, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.