श्रीवर्धन ( रायगड ) - श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये एक बेवारस बोट आढळून आली आहे. सकाळी आठ वाजता स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की या ठिकाणी कोणती तरी बोट उभी आहे. त्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस पाटलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली. श्रीवर्धन पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना AK 47 rifles bullets found on boat near Harihareshwar beach झाले.
पोलिसांनी सदर बोटीची झडती घेतली असताना त्यामध्ये तीन एके 47 आढळून आल्या. तसेचस, काही कागदपत्रे देखील आढळून आली असून सदरची बोट ही यूकेमधील असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, यामध्ये काही छोटे-छोटे बॉक्स आहेत. त्यामध्ये सुद्धा काही वस्तू आहेत का? याबाबतही पोलीस खात्री करत आहेत. भरडखोल समुद्र किनारी सुद्धा अशाच प्रकारची एक छोटी बोट आढळून आली असून, ती अतिशय छोटी बोट आहे. त्यामध्ये फक्त लाईफ जॅकेट आढळून आले. हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट व त्यामध्ये सापडलेली हत्यारे याबद्दल श्रीवर्धन तालुक्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले असून, अनेक अफवा देखील पसरविल्या जात आहेत.
उद्या दहीहंडीचा सण असून श्रीवर्धन तालुक्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. उद्या होणारा दहीहंडी सण व आगामी येणारा गणेशोत्सव याकाळात काही घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा डाव तर नाही ना? असा संशय अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे श्रीवर्धन कडे येण्यासाठी निघाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा - Suspected Boat In Raigad हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत Ak 47 सापडल्यानं रायगडमध्ये हायअलर्ट