ETV Bharat / state

Agniveer Prajwal Tawari : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रज्वल बनला पेणचा पहिला अग्निवीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य तरुणांना देशसेवा करता यावी यासाठी स्थापन केलेल्या, अग्निवीर आर्मीमध्ये भरती होण्यासाठी पेण तालुक्यातील तरुण गेला होता. तब्बल सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत त्याने पेण तालुक्यातील पहिला अग्निवीर होण्याच्या मान मिळवला आहे. प्रज्वल टावरी असे या तरुणाचे नाव आहे. प्रज्वल पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र आहे.

Agniveer Prajwal Tawari
प्रज्वल बनला पेणचा पहिला अग्निवीर
author img

By

Published : Jun 24, 2023, 5:15 PM IST

रायगड (पेण) : आर्मीमधील सहा महिन्यांचे खडतर ट्रेनिंग पूर्ण करुन प्रज्वल आपल्या जन्मगावी आल्यानंतर गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात गावकऱ्यांकडून प्रज्वलचे स्वागत करण्यात आले. रावे गावातील मनिषा टावरी आणि पद्माकर टावरी या दाम्पत्याचा सुपुत्र प्रज्वल अत्यंत गरीब कुटुंबात वाढला. मात्र, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रज्वलने अग्निवीर आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते पूर्णही केले.

आर्मीचे सहा महिन्यांचे ट्रेनिंग केले पूर्ण : स्वागतावेळी बोलताना प्रज्वल म्हणाले, आपले आई-वडील, काका रामभाऊ टावरी तसेच माता रायबादेवीच्या आशीर्वादाने यशस्वीपणे सैन्यात भरती झाल्याचे प्रज्वलने सांगितले. प्रज्वलने आर्मीचे सहा महिन्यांचे ट्रेनिंग यशस्वीरीत्या पुर्ण केले. आता तो पेण तालुक्यातील युवकांचे आदर्श बनला आहे. आपला ट्रेनिंग कार्यकाळ संपवून प्रज्वल टावरी प्रथमच आपल्या रावे या जन्मगावी आल्याने, गावात त्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध मंडळांकडून बॅनर लावण्यात आले होते.

प्रज्वलची काढली मिरवणूक : लहान मोठ्यांसह महिला, पुरुष व आबालवृद्धांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय शिवराय अशा घोषणा देत, फटाक्यांच्या आतषबाजी केली. तसेच ढोल ताशाच्या गजरात प्रज्वलची मिरवणूक काढली. सुवासिनी महिलांनी प्रज्वलवर फुलांची उधळण करत ओवाळणी केली. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गाव कमिटी, राजकीय नेते, परिसरातील समाजसेवक तसेच गावकरी, प्रज्वलचे आई वडील, नातेवाईक उपस्थित होते.

पहिला अग्निवीर होण्याचा मान : रावे या गावचा रहिवाशी असलेल्या प्रज्वल टावरी याने तालुक्यातून पहिला अग्निवीर होण्याचा मान मिळवला आहे. नुकताच तो ट्रेनिंग पूर्ण करत रावे गावी परतला आहे. यावेळी गावकऱ्यांनी त्याचे फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले आहे. गरीब कुटुंबातील प्रज्वलने केलेल्या या धाडसाचे परिसरातील अनेक युवकांनी अनुकरण करून देश सेवेसाठी सैन्यात भर्ती झाले पाहिजे.

हेही वाचा -

  1. Rakesh Paswan Murder: भीम आर्मीचा नेता राकेश पासवानच्या हत्येनंतर बिहारमध्ये समर्थक आक्रमक, मोठ्या प्रमाणावर हिंसा
  2. Army Day Parade : सीमेवरील प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत - लष्करप्रमुख मनोज पांडे
  3. Eknath Shinde In Army : '..तर कदाचित आज मी सैन्यात असतो', एकनाथ शिंदेंनी सांगितली सैन्याचे ट्रेनिंग सोडल्याची कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.