ETV Bharat / state

पनवेलमध्ये खड्ड्यांविरोधात राजे प्रतिष्ठानचं अनोखं आंदोलन; वाहनचालकांना झंडू बामचे केले वाटप - ROAD

रस्त्यांवरी पडलेले खड्डे न भरल्याने शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काल (19 सप्टेंबर) ला राजे प्रतिष्ठानच्या वतीने अनोखं आंदोलन केलं. यावेळी वाहनचालकांना झंडू बाम देऊन रोष व्यक्त करण्यात आला.

पनवेलमधे खड्ड्यांविरोधात राजे प्रतिष्ठानचं अनोखं आंदोलन
author img

By

Published : Sep 20, 2019, 7:10 AM IST

Updated : Sep 20, 2019, 9:15 AM IST

रायगड - रस्त्यांवर पडलेले खड्डे न भरल्याने शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात काल (19 सप्टेंबर) ला राजे प्रतिष्ठानच्या वतीने अनोखं आंदोलन केलं. यावेळी वाहनचालकांना झंडू बाम देऊन रोष व्यक्त करण्यात आला.

पनवेलमधे खड्ड्यांविरोधात राजे प्रतिष्ठानचं अनोखं आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या नावानं बोंब मारून पनवेलकर आता थकले आहेत. कारण या ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय भयानक होत आहे. दरवर्षी प्रमाणे या दरवर्षी महामार्गावरील पडलेले खड्डे भरण्याचे काम केले नाही. त्यामुळे याच खड्डयातून आपली वाट शोधत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी राजे प्रतिष्ठानच्या वतीने झंडू बाम देऊन हे अनोखं आंदोलन केलं. मुंबई – गोवा महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा २०११ ला सुरू झाला. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांना मोठा आनंद झाला होता. मात्र, महामार्गाच्या या कामाची दशकपूर्ती होत आली, तरी प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याचा आनंद अजूनही मिळाला नाही आहे.

हेही वाचा - मुंबईमध्ये काँग्रेसचे आर्थिक मंदीसह महागाई विरोधात धरणे आंदोलन

अशातच आठवडाभरापासून कोसळणारा मुसळधार पाऊस, विविध प्रकल्पांतर्गत सुरू असलेली रस्ते-पुलांची कामे, अवजड वाहनांची वाढती रहदारी यामुळे पळस्पे फाटा या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजारही जडले आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. या दररोजच्या खड्ड्यातील जीवघेण्या प्रवासामुळे पनवेलकर मेटाकुटीस आले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने राजे प्रतिष्ठानने हे आंदोलन केलं आहे. यावेळी वाहनचालकांचा रोष दिसुन आला.सत्ताधारी चांगले रस्ते तर नाही देऊ शकले पण राजे प्रतिष्ठानने आम्हाला झंडू बाम देऊन आमच्या वेदनेवर औषध तरी दिले, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी दिल्या.

Intro:बातमीला एडिटेड पॅकेज जोडले आहे

लोकेशन - पनवेल

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या नावानं बोंब मारून पनवेलकर आता थकलेत..कारण मुंबई गोवा महामार्गावरच्या अनेक महत्वाच्या टप्प्याच्या ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय भयानक होतेय..या खड्ड्यांकडे पालिका आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राजे प्रतिष्ठाननं अनोखं आंदोलन केलं... ठेकेदाराकडून दरवर्षी प्रमाणे महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम केले नाही, त्यामुळे याच खड्डयातून आपली वाट शोधत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी राजे प्रतिष्ठानच्या वतीने झंडू बाम देऊन हे अनोखं आंदोलन केलं.
Body:मुंबई – गोवा महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा 2011ला सुरू झाला. त्यामुळे कोकणात जाणारे चाकरमानी व प्रवाशांना मोठा आनंद झाला होता. मात्र, महामार्गाच्या या कामाची दशकपूर्ती होत आली, तरी प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याचा आनंद अजूनही नॅशनल हायवे व प्रशासनाने प्रवाशांना मिळू दिलेला नाही.

आठवडाभरापासून कोसळणारा मुसळधार पाऊस, विविध प्रकल्पांतर्गत सुरू असलेली रस्ते-पुलांची कामे, अवजड वाहनांची वाढती रहदारी यामुळे पळस्पे फाटा या महत्त्वाच्या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. महामार्गाने रोज प्रवास करणार्‍या चालकांना, प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजारही जडले आहेत. तर अनेक दुचाकीस्वारांचे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होतात. दररोजच्या खड्ड्यातील जीवघेण्या प्रवासामुळे पनवेलकर मेटाकुटीस आले आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने त्यांना जागं करण्यासाठी राजे प्रतिष्ठानच्या वतीने वाहनचालकांना झंडू बाम देऊन हे अनोखं आंदोलन केलं आहे. यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे प्रत्येक वाहनचालक झंडू बाम घेते वेळी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या सुस्त कारभाराविरोधात सूर लावताना दिसुन आले. त्याचप्रमाणे सत्ताधारी चांगले रस्ते तर नाही देऊ शकले पण राजे प्रतिष्ठानने आम्हाला झंडू बाम देऊन आमच्या वेदनेवर औषध तरी दिले, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी दिल्या. Conclusion:खड्डयांमुळे नागरिकांना अनेक दुखण्यांनी ग्रासले असून प्रशासनाने आता तरी खड्डे बुजवावे यासाठी इलाज म्‍हणून आपण हे झंडू बाम वाटप केल्याचं, राजे प्रतिष्ठानचे मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके यांनी सांगितलं.

तर जोपर्यंत शहरातल्या रस्ते सुस्थितीत होणार नाही तो पर्यंत राजे प्रतिष्ठानचं हे आंदोलन सुरूच राहील असं रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी सांगितलं.
Last Updated : Sep 20, 2019, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.