रायगड - दहीहंडीनंतर नदीवर पोहायला गेलेला गोविंदा बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील तळा तालुक्यातील फासेवाडी गावची ही घटना आहे. या घटनेत ५३ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. विजय दर्गे असे मृत झालेल्या गोविंदाचे नाव आहे. विजय हा मूळचा फासेवाडी गावचा रहिवासी आहे.
राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. रायगड जिल्ह्यातही दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा केला गेला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा गोविंदा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विजय दर्गे हे पाण्यात बुडल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो मृतावस्थेत सापडला.