ETV Bharat / state

उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर अखेर हातोडा - उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर अखेर हातोडा

उद्योगपती अशोक मित्तल यांची अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे पाच एकर मालमत्ता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशोक मित्तल याना ५१४ स्केअर मीटर बांधकामाची परवानगी दिली होती. मात्र, मित्तल यांनी दोन हजार स्क्वेअर मीटरचे वाढीव अनधिकृत बांधकाम केले होते. उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांच्याविरोधात निकाल देऊन वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर अखेर हातोडा
author img

By

Published : Nov 8, 2019, 7:30 PM IST

Updated : Nov 8, 2019, 10:04 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्यातील कोळगाव गावातील उद्योगपती अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवून अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यास सुरू केले. बांधकाम पाडताना पावसाला सुरुवात झाल्याने भर पावसात बांधकाम पाडण्यात आले. आगामी काळात अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसॉर्टवर अखेर हातोडा

उद्योगपती अशोक मित्तल यांची अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे पाच एकर मालमत्ता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशोक मित्तल यांना ५१४ स्केअर मीटर बांधकामाची परवानगी दिली होती. मात्र, मित्तल यांनी दोन हजार स्क्वेअर मीटरचे वाढीव अनधिकृत बांधकाम केले होते. अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात बॉम्बे इन्व्हरमेन्ट एक्शन ग्रुपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होते. उच्च न्यायालयाने अशोक मित्तल यांच्याविरोधात निकाल देऊन वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी अशोक मित्तल यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस दिली होती. त्यानुसार वाढीव अनधिकृत बांधकाम स्वतः पाडा अथवा आम्ही कारवाई करू, असे आदेश दिले होते. मात्र, मित्तल यांनी बांधकाम पाडले नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ७ नोव्हेंबर रोजी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पाहणी केली होती. त्यानुसार आज ८ नोव्हेंबर रोजी मित्तल यांच्या रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा फिरला आहे.

अशोक मित्तल यांनी केलेले आलिशान बांधकाम पाडण्यास प्रशासनाला दोन महिने लागण्याची शक्यता आहे. बांधकाम हे आरसीसीचे असून सार्वजनिक बांधकाम विभागला यंत्रसामुग्री वाढवावी लागणार आहे. तसेच प्रशासनाला ५१४ स्क्वेअर मीटर बांधकाम ठेऊन अनधिकृत वाढीव दोन हजार स्केअर मीटर बांधकाम पाडायचे आहे. तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, कर्मचारी, पोलीस यावेळी उपस्थित होते.

Intro:उद्योगपती अशोक मित्तल यांच्या आलिशान रिसीर्टवर अखेर हातोडा पडला

अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यासाठी लागणार दोन महिने

रायगड : अलिबाग तालुक्यातील कोळगाव गावातील उद्योगपती अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवून अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यास सुरू केले. बांधकाम पाडताना पावसाने सुरुवात केली असून पावसात बांधकाम पाडण्यात आले. आगामी काळात अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

Body:उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे पाच एकर मालमत्ता आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी अशोक मित्तल याना 514 स्केअर मीटर बांधकामाची परवानगी दिली होती. मात्र मित्तल यांनी दोन हजार स्केअर मीटरचे वाढीव अनधिकृत बांधकाम केले होते. अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात बॉम्बे इन्व्हरमेन्ट एक्शन ग्रुपने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने अशोक मित्तल याच्या विरोधात निकाल देऊन वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.

Conclusion:जिल्हाधिकारी रायगड यांनी अशोक मित्तल याना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नोटीस दिली होती. त्यानुसार वाढीव अनधिकृत बांधकाम स्वतः पाडा अथवा आम्ही कारवाई करू असे आदेश दिले होते. मात्र मित्तल यांनी बांधकाम पाडले नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 7 नोव्हेबर रोजी प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पाहणी केली होती. त्यानुसार आज 8 नोव्हेंबर रोजी मित्तल यांच्या रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाचा हातोडा फिरला आहे.

अशोक मित्तल यांनी केलेले आलिशान बांधकाम पाडण्यास प्रशासनाला दोन महिने लागण्याची शक्यता आहे. बांधकाम हे आरसीसीचे असून सार्वजनिक बांधकाम विभागला यंत्रसामुगी वाढवावी लागणार आहे. तसेच प्रशासनाला 514 स्केअर मीटर बांधकाम ठेऊन अनधिकृत वाढीव दोन हजार स्केअर मीटर बांधकाम पाडायचे आहे. तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, कर्मचारी, पोलीस यावेळी उपस्थित होते.
Last Updated : Nov 8, 2019, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.