ETV Bharat / state

राज्यमंत्री आदिती तटकरेंकडे ८ विभागाचा पदभार, विधी व न्याय विभागाचाही समावेश - रायगड जिल्हा बातमी

आज आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले आहे.

Aditi Tatkare
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 23, 2020, 7:27 PM IST

रायगड - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांच्याकडे आज विधी व न्याय या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर झालेल्या मंत्रिपदाच्या खातेवाटपात तटकरे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या खात्यांच्या जबाबदारी देण्यात आली होती.

त्यानंतर आज आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले आहे. मुख्यमंत्र्यांकडील माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या 2 महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रिपद तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याने आता त्यांच्याकडे राज्यामंत्रिपदाच्या एकूण 8 विभागाचा पदभार आला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळातील युवा मंत्री म्हणून तटकरे यांनी आपल्या कार्यशैलीची छाप मुख्यमंत्र्यांवर सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.