ETV Bharat / state

सोशल मीडियावर डॉ. अमोल कोल्हे ट्रोल; नेटकऱ्यांची करमणूक - रायगड

छत्रपती संभाजी मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर सद्या टीकेचे लक्ष ठरत आहेत. डॉ. अमोल कोल्हे हे रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजीमंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी महाडमध्ये येत आहेत.

डॉ. अमोल कोल्हे
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:46 PM IST

रायगड - छोट्या पडद्यावरील छत्रपती संभाजी मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर सद्या टीकेचे लक्ष ठरत आहेत. ते रायगडमध्ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी येत असल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना ट्रोल केले जात आहे. छत्रपतींच्या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वी जनतेच्या गळ्यातील ताईत ठरलेले कोल्हे यांच्यावर आता मात्र चहू बाजुने टीका होत आहे.

Amol
डॉ. अमोल कोल्हे ट्रोल

छोट्या पडद्यावर छत्रपती शिवराय आणि संभाजी राजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजीमंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी महाडमध्ये येत आहेत. या सभेचा प्रचार करताना राष्ट्रवादीच्या समर्थकांनी कोल्हे यांचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामध्ये "मी येतोय स्वराज्याच्या राजधानीत रायगडमध्ये सुनिल तटकरे यांना साथ देण्यासाठी", "तुम्ही या लढाईत सामिल व्हा" ही लढाई आपल्याला जिंकायची आहे ! असा संदेश डॉ. कोल्हे यांच्या नावाने देण्यात आला आहे.

Amol
डॉ. अमोल कोल्हे ट्रोल

माजीमंत्री सुनिल तटकरे यांच्यावर जलसिंचनात भ्रष्टाचाराचे व पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर बोगस कंपन्या असल्याचे आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झालेले आहेत. राज्यातील जलसिंचन प्रकल्पांवर हजारो कोटींचा निधी खर्च होऊनही पुरेशा प्रमाणात सिंचन झाले नसल्याचा ठपका तटकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत हा विषय पुन्हा चर्चिला जात असुन धर्मवीर आणि रयतेचा राजा म्हणून प्रभावी प्रतिमा असलेले कोल्हे यांचे मात्र त्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रोलींग केले आहे. कोल्हे यांच्या विरोधात बरेच काही बोलले जात आहे. त्यामध्ये "कोल्हे येताहेत रायगडमध्ये, धर्मवीर राजांच्या भूमिके आडून जलसिंचन भ्रष्टाचार, बोगस कंपन्या आणि मनी लोन्ड्रिंग आदींचे उदातीकरण करण्यासाठी" "जलसिंचन भ्रष्टाचारातून झालेल्या हजारो निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांवर तिलांजली वाहण्यासाठी, ये पैसा बोलता है". अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच बरोबर "मी येतोय स्वराज्याच्या राजधानीत रायगडमध्ये भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासाठी", "तुम्हीही सामिल व्हा आपल्याला शेतकऱ्याला संपवायचे आहे" त्यांच्या जमिनी कवडी मोलात विकत घेऊन गब्बर व्हायचे आहे आणि त्याच पैशावर निवडणुकाही लढवायच्या आहेत! या आशयाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सोशल मिडियावर डॉ. अमोल कोल्हे यांना अनेकांनी केले ट्रोल ; नेटकऱ्यांची होत आहे करमणुक

रायगड : झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या छत्रपती संभाजी मालिकेत राजांची भुमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मिडियावर सद्या टीकेचे लक्ष ठरत आहेत. ते रायगड मध्ये लोकसभा निवडणुक प्रचारासाठी येत असल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांना ट्रोल केले जात आहे. छत्रपतींच्या भूमिकेमुळे काही दिवसांपुर्वी जनतेच्या गळ्यातिल ताईत ठरलेले कोल्हें यांच्यावर आता मात्र चहू बाजुने टीका होत आहे.

छोट्या पडदयावर छत्रपती शिवराय आणि संभाजी राजांची भुमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजीमंत्री सुनिल तटकरे यांच्या प्रचारसभेसाठी महाड, जिल्हा रायगड मध्ये येत आहेत. यासभेचे प्रमोशन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी कोल्हे यांचे बेनर्स सोशल मिडियावर वायरल केले आहेत. त्यामध्ये "मी येतोय स्वराज्याच्या राजधानीत रायगड मध्ये सुनिल तटकरे यांना साथ देण्यासाठी", "तुम्ही या लढाईत सामिल व्हा" ही लढाई आपल्याला जिंकायची आहे ! असा संदेश डॉ कोल्हे यांच्या नावाने देण्यात आला आहे. 
   माजीमंत्री सुनिल तटकरे यांच्यावर जलसिंचन भ्रष्टाचाराचे व पुत्र आम. अनिकेत तटकरे यांच्यावर बोगस कंपन्या असल्याचे आणि मनी लोन्ड्रिंगचे जाहीर आरोप झालेले आहेत. राज्यातिल जलसिंचन प्रकल्पांवर हजारो कोटींचा निधी खर्च होऊनही पुरेशा प्रमाणात सिंचन झाले नसल्याचा आणि त्यातुन हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा ठपका तटकरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत हा विषय पुन्हा चर्चिला जात असुन धर्मवीर आणि रयतेचा राजा म्हणून प्रभावी प्रतिमा असलेले कोल्हे यांचे मात्र त्यावरुन नेटकऱ्यांनी ट्रॉलींग केले आहे. कोल्हे यांच्या विरोधात बरेच काही बोलले जात आहे. त्यामध्ये "कोल्हे येताहेत रायगड मध्ये, धर्मवीर राजांच्या भूमिके आडून जलसिंचन भ्रष्टाचार, बोगस कंपन्या आणि मनी लोन्ड्रिंग आदींचे उदातीकरण करण्यासाठी" "जलसिंचन भ्रष्टाचारातुन झालेल्या हजारो निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांवर तिलांजली वाहण्यासाठी, ये पैसा बोलता है". अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच बरोबर "मी येतोय स्वराज्याच्या राजधानीत रायगड मध्ये भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासाठी", "तुम्हीही सामिल व्हा आपल्याला शेतकऱ्याला संपवायचे आहे" त्यांच्या जमिनी कवडी मोलात विकत घेऊन गब्बर व्हायचे आहे आणि त्याच पैशवर निवडणुकाही लढवायच्या आहेत! या आशयाच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. मागिल काळात सुनिल तटकरे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन सद्या कोल्हे यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्यामुळे कोल्हे हे सोशल मिडियावर लोकांची अशीही करमणूक करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.