ETV Bharat / state

आधार-द हेल्पिंग हँड्स संस्थेचा प्रशासनाला मदतीचा हात, उभारले 25 बेडचे विलगीकरण कक्ष - Alibag corona news

अलिबागमध्येही कोरोना रूग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे येथील 2 कोरोना रूग्णालयांवर ताण येऊ लागला आहे. आता आधार - द हेल्पिंग हँड्स ही संस्था कोरोना काळात प्रशासनाच्या मदतीला पुढे आली आहे. या संस्थेने 25 बेडचे विलगीकरण कक्ष बनवले आहे. याची क्षमता 45 बेडपर्यंत वाढविली जाणार आहे.

alibag
अलिबाग
author img

By

Published : May 8, 2021, 6:04 PM IST

रायगड - कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे कठीण झालेले आहे. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. ही अडचण ओळखून अलिबाग मधील 'आधार- द हेल्पिंग हँड्स' ही संस्था आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावून आली आहे. अलिबाग शहरातील जैन मंदिर धर्मशाळा हॉलमध्ये कोरोना रुग्णासाठी 25 बेड असलेले विलगीकरण कक्ष स्वः खर्चाने तयार केले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिजामाता कोविड सेंटरमधील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या विनामूल्य विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. आधार- द हेल्पिंग हँड्सच्या या पुढाकाराने रुग्णालयातील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. या संस्थेच्या पुढाकारातून इतर सामाजिक संस्थांनी अशा प्रकारच्या मदतीसाठी पुढे येणे ही काळाची गरज ठरणार आहे.

आधार - द हेल्पिंग हँड्स संस्थेचा प्रशासनाला मदतीचा हात,

जिल्हाधिकाऱ्यांकडून आधारला 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 'आधार-द हेल्पिग हँड्स'ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षाला भेट दिली. आधार संस्थेने केलेल्या कार्याबद्दल त्याचे कौतुक केले. तसेच, विलगीकरण कक्षाला 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट दिले. जेणेकरुन कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागल्यास त्याचा उपयोग होऊ शकेल.

'आधार-द हेल्पिंग हँड्स' ही संस्था कोरोना प्रादुर्भाव सुरू (2020) झाल्यापासून आपले सामाजिक दायित्व पूर्ण करत आहे. गेल्यावर्षी कोरोना काळात संस्थेने अनेक गरजूंना मदत केली. यावर्षी पुन्हा दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले आहे. संस्थेचे सदस्य धनंजय म्हात्रे, भरत जैन आणि इतर सदस्यांनी एकत्रित येऊन पुन्हा प्रशासनाच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे हे ओळखून विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, स्वतःच्या खिशातील पैसे टाकून आणि इतर दानशूर व्यक्तिच्या मदतीने विलगीकरण कक्ष अलिबाग जैन मंदिर सभागृहात सुरू केले.

25 बेडची व्यवस्था, 45 बेडची वाढविणार क्षमता

जैन मंदिर सभागृहात तयार केलेल्या विलगीकरण कक्षात 25 बेड, 2 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, पंखा, कुलरची व्यवस्था आहे. विलगीकरण कक्षात डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे रुग्णांना मोफत जेवण, नाष्टा, चहाची सोय केली आहे. तसेच रुग्णांना मनोरंजनासाठी कॅरमची सुविधाही आहे. विलगीकरण कक्षात येणाऱ्या रुग्णाला प्रसन्न वातावरणात ठेवण्याची सुविधा आधारतर्फे करण्यात आलेली आहे. सध्या 25 बेडची सुविधा केली आहे. ही क्षमता 45 पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे संस्थेचे धनंजय म्हात्रे यांनी म्हटले आहे.

जिल्हा सामान्य आणि जिजामाता रुग्णालयाचा ताण होणार कमी

कोरोना रुग्णांना अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी ठेवले जाते. गंभीर असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुगणालायत तयार केलेल्या कोरोना रुग्णालयात ठेवले जाते. तर कमी लक्षणे असलेले रुग्णांवर जिजामाता रुग्णालयात उपचार केले जातात. मात्र, सध्या अलिबागमध्ये रुग्णाची संख्या ही 3 हजारावर गेली असल्याने बेडची कमतरता पडू लागली आहे. गंभीर रुग्ण काही प्रमाणात बरे झाल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये हलविले जात असते. आता जिल्हा सामान्य आणि जिजामाता रुग्णालयातील रुग्ण हे जैन मंदिर येथे तयार झालेल्या विलगीकरण कक्षात हलविले जाणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.

हेही वाचा - 'लोकांचे प्राण जाऊ शकतात, पण पंतप्रधानांची जीएसटी वसूली थांबत नाही'

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली उपसमितीची महत्वाची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.