ETV Bharat / state

८ वर्षीय चिमुकलीचे धाडस; स्त्री भ्रूण हत्येविरोधात सायकलवरून जनजागृती, १२० किमीचा प्रवास

२१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या आठ वर्षाच्या मुलीने स्वीकारले आहे. या जनजागृतीकरता सईने एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून आपला प्रवास सुरू केला. ती सायकलवरून अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहे.

raigad
सई ठाकूर
author img

By

Published : Dec 27, 2019, 11:00 AM IST

रायगड - राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीने सायकल प्रवास सुरू केला आहे. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते बालकुम असा १२० किमी प्रवास करणारी ही चिमुकली नुकतीच पनवेलमध्ये पोहोचली आणि तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सई ठाकूर (८) असे या चिमुकलीचे नाव आहे.

raigad
सई ठाकूर

प्रत्येकाची प्रवास करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात मात्र, एखाद्या ध्येयाने पछाडून प्रवासाला निघणारे विरळेच असतात. अशीच ठाण्यातली सई ठाकूर ही ध्येयवेडी चिमुकली. २१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या मुलीने स्वीकारले आहे. स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृतीकरता सईने एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून आपला प्रवास सुरू केला आहे. ती सायकलवरून अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहे.

सायकल चालवून चिमुकलीचा स्त्री भ्रूण हत्येशी लढा

हेही वाचा - महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग अडकला टक्केवारीत

अवघ्या ८ वर्षाच्या सईचे तिच्या या उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. सई ही आपल्या प्रवासादरम्यान पनवेलमध्ये पोहोचली. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी सईला पुष्पगुच्छ देत तिच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यात सुरू असलेल्या महिला, मुलींवरील बलात्काराच्या घटना किंवा स्त्रीभ्रूण हत्येसारख्या घटनांचे गांभीर्य या ८ वर्षाच्या मुलीला कळले. पण, अजूनही जाणते मात्र अजाणतेपणाचे ढोंग करत आहे, हे आपल्या शिक्षित समाजाचे दुर्दैवच म्हणावे लागेल!

हेही वाचा - महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकांच्या दोन गटात हाणामारी

Intro:सोबत एडिटेड पॅकेज जोडले आहे

पनवेल

राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीनं सायकल प्रवास सुरु केलाय. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते बालकुम असा 120 किमी प्रवास करणारी ही चिमुकली नुकतीच पनवेलमध्ये पोहोचली आणि तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
Body:प्रत्येकाची प्रवास करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात; मात्र एखाद्या ध्येयाने पछाडून प्रवासाला निघणारे विरळेच असतात. अशीच ही ठाण्यातली सई ठाकूर ध्येयवेडी चिमुकली...मुलगाच पाहिजे असा आग्रह काही नवा नाही. २१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र समाजात असणारी ही मानसिकता बदलण्याचं आव्हान या आठ वर्षाच्या चिमुकलीनं स्वीकारलंय...
एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून सुरू केलेल्या या प्रवासात ही चिमुकली सायकलवरून अनेक गावांना भेट देतेय आणि गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करतेय.

सई ठाकूर हिच्या या उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून कौतुक होतंय. सई ठाकूर पनवेलमध्ये आल्यानंतर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी सईला पुष्पगुच्छ देत तिच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
Conclusion:राज्यात सुरू असलेल्या महिला मुलींवर बलात्कार आणि स्त्री भ्रूण हत्या सारख्या घटनांचे गांभीर्य या आठ वर्षाच्या चिमुकलीला कळले पण अजूनही जाणते मात्र अजाणतेपणाचे ढोंग करतायेत, हे दुर्दैव!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.