ETV Bharat / state

अलिबाग तालुक्यातील सहा गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित - villages declared containment zone

रायगड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरली आहे. तालुक्यात 63 ग्रामपंचायती असून वरंडे आणि मानकुळे सोडता 61 ग्रामपंचायतीत कोरोनाचे रुग्ण आहेत.

6 villages declared containment zone in alibag taluka
अलिबाग तालुक्यातील सहा गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित
author img

By

Published : Jun 13, 2021, 12:19 PM IST

Updated : Jun 13, 2021, 1:21 PM IST

रायगड - जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहेत. अलिबाग तालुका मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे. तालुक्यातील चौल, नागाव, रेवदंडा, कुरुळ, नवे नवगाव या ग्रामपंचायती हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळे तालुक्यातील ही सहा गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याबाबत अलिबाग प्रांताधिकारी यांनी आदेश काढले आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातील गावात आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून लवकरच ही गावे कोरोनामुक्त होतील, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.

तहसीलदार सचिन शेजाळ याबाबत माहिती देताना

तालुक्यात 63 पैकी 61 ग्रामपंचायत हद्दीतील गावात कोरोना रुग्ण

रायगड जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. अलिबाग तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरली आहे. तालुक्यात 63 ग्रामपंचायती असून वरंडे आणि मानकुळे सोडता 61 ग्रामपंचायतीत कोरोनाचे रुग्ण आहेत. तालुक्यातील रेवदंडा 66, चौल 89, नागाव 82, चेंढरे 70, कुरुळ 57, नवे नवगाव 47, बेलोशी 40 या ग्रामपंचायतीत कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. अलिबाग तालुक्यात सद्यस्थितीत 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर 423 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

containment zone
कोरोना प्रतिबंधित क्षेत्र

हेही वाचा - मराठा समाजाची दिशाभूल होऊ देणार नाही; १६ जूनपासून मूक आंदोलन - संभाजीराजे छत्रपती

प्रांताधिकारी यांनी सहा गावात घोषित केले मिनी कंटेन्मेंट झोन -

अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी रुग्ण संख्या जास्त असलेल्या चौल, कुरुळ, नवे नवगाव, रेवदंडा, नागाव या ग्रामपंचायटीमधील गावांना कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या गावातील लग्न समारंभावरही कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गावातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

लवकरच गावे कोरोनामुक्त करणार -

अलिबाग तालुक्यातील नागाव, रेवदंडा, चौल, कुरुळ, नवे नवगाव या गावात कोरोना रुग्णाची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही गावे प्रांताधिकारींच्या आदेशाने कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या गावात आरोग्य विभागाकडून आणि स्थानिक प्रशासनामार्फत तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच ही गावे कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

Last Updated : Jun 13, 2021, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.