ETV Bharat / state

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, २ जखमी - accident on mumbai pune express way

मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी साताऱ्यावरून लग्नसमारंभ उरकून परत येत होते. मात्र, कार रसायनी पोलीस ठाण्याजवळ येताच कारने टँकरला जोरदार धडक दिली. यावेळी कार पूर्णपणे टँकरमध्ये घुसली होती. या कारमधून ६ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

4 killed in accident on mumbai pune express way near raigad
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
author img

By

Published : Nov 29, 2019, 8:19 AM IST

Updated : Nov 29, 2019, 9:00 AM IST

रायगड : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कारने टँकरला मागील बाजूस धडक दिली. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी साताऱ्यावरून लग्नसमारंभ उरकून परत येत होते. मात्र, कार रसायनी पोलीस ठाण्याजवळ येताच कारने टँकरला जोरदार धडक दिली. यावेळी कार पूर्णपणे टँकरमध्ये घुसली होती. या कारमधून ६ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस डेल्टा फोर्स घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, मृताचे नातेवाईक आल्यावर अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटू शकते. याप्रकरणी अधिक तपास रसायनी पोलीस करीत आहेत.

Intro:मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात 4 ठार तर दोन अत्यव्यस्त, मृतांमधे तीन महिलांचा समावेश
रायगड - मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 17 वर रसायनी पोलिस ठण्याच्या हद्दित पहाटे मुंबई लेन वर एक टैंकर ला स्विफ्ट कार धड़कून अपघात झाला असून त्यात 4 ठार तर दोन प्रवासी जबर जखमी होत अत्यव्यस्त आहेत त्याना पनवेल च्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मृतांमधे तीन महिलांचा समावेश असल्याचे समजते सदर कुटुंब सातारयाहुन लग्नसमारम्भ उरकुन परतत असावे अशीही माहितीं मिळत आहेBody:आज पहाटे साढे पांच च्या दरम्यान मुंबई पूणा द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिस ठण्याच्या हद्दित एक भीषण अपघात झाला, एक स्विफ्ट कार ने एका टैंकर ला मागून जोरदार धड़क दिली धड़क देताच सदर स्विफ्ट कार टैंकर च्या मागिल भागात अक्षरशः पूर्ण घुसली होती या कार मधुन सहा जन प्रवास करीत होते त्यात चार जन जागीच ठार झाले तर दोन जनाना जबर मार लागला आहे, घटनेची माहितीं मिलताच रसायनी पोलिस डेल्टा फोर्स अपघात ठिकाणी त्वरित पोहचले व स्विफ्ट कार मधे आडकुन पडलेल्याना त्यांनी बाहर काढले तेव्हा चार जन जागीच ठार झाल्याचे त्याना समजले व दोन जनाना जबर मार लागला होता त्या दोगाना ही त्वरित पनवेल च्या एमजीएम रुग्णालयात हलवन्यात आलेConclusion:मिळालेल्या माहितीं नुसार सदर प्रवासी सातारयाहुन लग्न समारंभ उरकुन परतत असावेत तर चार मृतांपैकी तीन महिला असल्याचे समजते रसायनी पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत असून मृताचे नातेवाईक आल्याशिवाय अपघातातील व्यक्ति बाबत अधिक माहितीं मिळू शकते असे पोलिसांनी सांगितले
Last Updated : Nov 29, 2019, 9:00 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.