ETV Bharat / state

अलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणात ४ कोकेन विक्रेते नायझेरियन नागरिक अटकेत - रायगड

अलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणात चार नायझेरियन नागरिकांना अटक केल्याने गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

नायझेरियन आरोपी
author img

By

Published : Jul 15, 2019, 8:43 PM IST

रायगड - अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्या प्रकरणी 16 आरोपींना अटक केली होती. यामध्ये पुन्हा चार नायझेरियन आरोपींना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 260 ग्राम कोकेन जप्त केले असून बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये आहे. त्यामुळे या अंमली पदार्थ गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी, कोडीचीन्मा प्रोमिस यूची आणि ओलुवेदर स्ट्रीट लोगस अशी नायझेरियन आरोपींची नावे आहेत.

गेल्या 28 जूनला अलिबागमधील किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात सात पीडित टीव्ही अभिनेत्रींनाही अटक केली होती. यापैकी मुख्य आरोपी राखी नोटानी आणि रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्राम कोकेन जप्त केले होते. पोलिसांनी कोकेन कुठून आणले? याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता मुंबई येथून कोकेन घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना आणि हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दिपक अर्जुन अगरवाल या 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 50 ग्राम कोकेनही जप्त केले होते.

पकडलेल्या 5 आरोपींची चौकशी केली असता या गुन्ह्यातील दोन नायझेरियन कोकेन विक्रेता बाबत माहिती मिळाली. त्यानुसार 14 जुलैला पहाटे 2 वाजता स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचून कोडीचीन्मा प्रोमिस यूची, ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 181 ग्राम कोकेन जप्त केले. बाजारात त्याची किंमत 9 लाख 5 हजार आहे.

आतापर्यंत या गुन्ह्यात पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली असून 260 ग्राम कोकेन जप्त केले आहे. बाजारात या कोकेनची किंमत 13 लाख रुपये आहे. या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली.

या गुन्ह्यात चार नायझेरियन नागरिकांना अटक केल्याने गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ करीत आहेत.

Intro:अलिबाग सेक्स रॅकेट प्रकरणात कोकेन विक्रेते चार नायझेरियन नागरिक अटकेत

गुन्ह्यात 13 लाख किमतीचे 260 ग्राम कोकेन केले जप्त

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा होणार पर्दाफाश

रायगड : अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट व कोकेन बाळगल्या प्रकरणी 16 आरोपींना अटक केली होती. यामध्ये अजून चार नायझेरियन आरोपींना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एकूण 260 ग्राम कोकेन जप्त केले असून बाजारात त्याची 13 लाख रुपये किंमत आहे. त्यामुळे या अमली पदार्थ गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवली असून त्याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन आरोपींना याआधी अटक करण्यात आली असून कोडीचीन्मा प्रोमिस यूची (38), व ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोन आरोपींना 14 जुलै रोजी स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे.
Body:28 जून रोजी अलिबागमध्ये किहीम परिसरातील चिराणिका फार्म व कनकेश्वर फाटा परिसरातील सक्सेना फार्म येथे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. या प्रकरणात सात पीडित टीव्ही अभिनेत्रींनाही अटक केली होती. यातील मुख्य आरोपी राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांच्याकडून स्थानिक गुन्हे पथकाने 26 ग्राम कोकेन जप्त केले होते. पोलिसांनी कोकेन कुठून आणले याबाबत आरोपिकडे चौकशी केले असता मुंबई येथून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ओकोरो ल्यक पॉल, युझोग्बी फडनंड मेलोदी या दोन नायझेरियन नागरिकांना व हुसैन मुझफफर रझानी, मनिष दौलत टुकरेल, दिपक अर्जुन अगरवाल या पाच जणांना अटक केली असता त्याच्याकडून 50 ग्राम कोकेनही जप्त केले होते.

पकडलेल्या पाच आरोपिकडे तपास केला असता या गुन्ह्यातील दोन नायझेरियन कोकेन विक्रेता बाबत माहिती मिळाली. त्यानुसार 14 जुलै रोजी पहाटे 2 वाजता स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचून कोडीचीन्मा प्रोमिस यूची, ओलुवेदर स्ट्रीट लोगस या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 181 ग्राम कोकेन जप्त केले असून त्याची बाजारात 9 लाख 5 हजार किंमत आहे. आतापर्यत या गुन्ह्यात पोलिसांनी 20 आरोपींना अटक केली असून 260 ग्राम कोकेन जप्त केले आहे. या कोकेनही बाजारात 13 लाख रुपये किंमत आहे. या गुन्ह्यात पकडलेल्या आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 22 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली.
Conclusion:या गुन्ह्यात चार नायझेरियन नागरिकांना अटक केल्याने गुन्ह्याची पाळेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या सूचनेनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ याच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे ए शेख, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.