ETV Bharat / state

मद्यधुंद 3 तरूणांची एसटी कंडक्टरला मारहाण; आरोपी अटकेत

author img

By

Published : Nov 12, 2019, 5:01 PM IST

राहुल कांबळे (24), आकाश जावळे (23) आणि ऋषिकेश पवार (22) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही तरुण उलवे आणि पनवेलमधील राहणारे आहेत.

मद्यधुंद 3 तरूणांची एसटी कंडक्टरला मारहाण

पनवेल - नेरुळ स्टेशनपासून उलवेच्या दिशेने जाणाऱ्या एनएमएमटी बसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 मद्यधुंद तरूणांनी वाहकाला आणि प्रवाशांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. या 3 मद्यधुंद तरुणांनी पोलिसांनी त्यांनी पकडल्यावर त्यांना देखील हेल्मेटने मारहाण करून जखमी केले आणि तिथून फरार झाले. त्यानंतर या 3 मद्यधुंद तरुणांना पोलीस अटक केली आहे.

हेही वाचा - अलिबागच्या समुद्रकिनारी एकही बेकायदेशीर बंगला नको; उच्च न्यायालयाने राज्य शासनाला फटकारले

राहुल कांबळे (24), आकाश जावळे (23) आणि ऋषिकेश पवार (22) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही तरुण उलवे आणि पनवेलमधील राहणारे आहेत.

मंगळवारी रात्री या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत नेरुळ स्टेशनवरून उलवेच्या दिशेने जाणारी 17 क्रमांकाची एनएमएमटी बस पकडली. यावेळी ते तिघेही बसच्या पुढील दरवाज्याने बसमध्ये चढत होते. त्यावेळी याच बसमधील वाहक केतन चव्हाण यांनी त्यांना बसच्या मागच्या दरवाजाने चढण्यासाठी सांगितले. यामुळे चिडलेल्या तिघांनी ही वाहक केतन चव्हाण यांना शिवीगाळ केली. याप्रसंगी दोघांमध्ये बाचाबाची होऊन मद्यधुंद अवस्थेत तिघा तरुणांनी वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी बसचालक आणि रिक्षाचालकांनी मध्यस्थी करत तरूणांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणाचेच न ऐकता धुडगूस घालत होते. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी तिघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी तरूणांनी घाबरून तेथून पळ काढला.

हेही वाचा - पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीमुळे पोलीस आणि नागरिकांची गैरसोय, हद्दीत बदल करण्याची मागणी

हे तरूण पनवेलमधील राहणारे असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये घातलेला तरुणांचा हा गोंधळ केवळ इथेच संपला नाही, तर पोलीस जेव्हा या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी पोलिसांनाही मारहाण केली. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Intro:सोबत AV जोडली आहे

पनवेल

पनवेलमधील तीन मद्यधुंद तरूणांनी नेरुळ स्टेशनपासून उलवेच्या दिशेने जाणाऱ्या एनएमएमटी बसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वाहकाला आणि प्रवाशांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. या तीन मद्यधुंद तरुणांचा हैदोस केवळ इथवरच नाही थांबला, तर या तिघांना पकडण्यास आलेल्या पोलिसांनादेखील त्यांनी हेल्मेटने मारहाण करून जखमी केलं आणि तिथून फरार झाले. त्यानंतर या तीन मद्यधुंद तरुणांना पोलीस कोठडीचा रस्ता दाखवण्यात पोलिसांना यश आलंय. Body:राहुल कांबळे (२४), आकाश जावळे (२३) आणि ऋषिकेश पवार (२२) अशी या तिघांची नावे असून, पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. हे तिघेही तरुण उलवे आणि पनवेलमधील राहणारे आहेत. काल रात्री या तिघांनी मद्यधुंद अवस्थेत नेरुळ स्टेशनवरून उलवेच्या दिशेने जाणारी 17 क्रमांकाची एनएमएमटी बस पकडली होती. यावेळी ते तिघेही बसच्या पुढील दरवाज्याने बसमध्ये चढत होते. त्यावेळी याच बसमधील वाहक केतन चव्हाण यांनी त्यांना बसच्या मागच्या दरवाजाने चढण्यासाठी सांगितलं. यामुळे चिडलेल्या तिघांनी ही वाहक केतन चव्हाण यांना शिव्या देत गाडीत चढले.याप्रसंगी दोघांमध्ये बाचाबाची होऊन मद्यधुंद अवस्थेत तिघा तरुणांनी वाहकाला लथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी बसचालक आणि रिक्षाचालकानी देखील मध्यस्थी करत तरूणांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कोणाचेच न ऐकता धुडगूस घालतच होते. ज्यावेळी वैतागून जेव्हा प्रवाशांनी मिळून त्या तिघा मद्यधुंद तरुणाना मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी घाबरून त्यांनी तिथून पळ काढला.Conclusion:या तरुणांचा अखेर शोध घेत ते पनवेलमधील राहणारे असल्याचं कळताच पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं. मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये घातलेला तरुणांचा हा हैदोस केवळ इथेच संपला नाही, तर पोलीस जेव्हा या तिघांना ताब्यात घेण्यासाठी गेले तेव्हा तिथले पोलिस नाईक पाटील यांच्या तोंडावर हेल्मेट फेकून त्यांना गंभीर जखमी केलं. याप्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.