ETV Bharat / state

Pen Gangrape Case : पेणमध्ये १७ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार; 7 आरोपींना अटक, 3 जण फरार - पेण सामूहिक बलात्कार अपडेट

पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका 17 वर्षीय युवतीला ( Gangrape On 17 Year Old Girl In Pen ) सतत धमकी देऊन ब्लॅकमेल करत काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील 7 आरोपींना ( 7 Accused Arrest In Pen Gangrape Case ) पोलिसांनी अटक केली असून 3 आरोपी अद्यापही फरार आहे.

raigad
raigad
author img

By

Published : Jan 30, 2022, 8:13 PM IST

पेण ( रायगड ) - पेण तालुक्यातील वाशी सरेभाग परिसरातील एका 17 वर्षीय युवतीला ( Gangrape On 17 Year Old Girl In Pen ) सतत धमकी देऊन ब्लॅकमेल करत काही युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील 7 आरोपींना ( 7 Accused Arrest In Pen Gangrape Case ) पोलिसांनी अटक केली असून 3 आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच याप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस -

पेण तालुक्यातील वाशी सरेभाग येथे राहणारी 17 वर्षीय युवती शेजारीच असलेल्या गावात एका कार्यक्रमासाठी गेली होती. या ठिकाणी रात्री या युवतीची ओळख 2 तरुणांसोबत झाली. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती व मोबाईल नंबर मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. या नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करीत होते. मागील अनेक महिन्यांपासून नराधमांनी तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, पीडित युवतीला हे नराधम लैंगिक शोषणाकरिता वारंवार फोन करीत होते. आपल्या मुलीला वारंवार फोन येत असल्याने पीडित युवतीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर पीडित युवतीने गॅंगरेपची व ब्लॅकमेलचे धक्कादायक वास्तव उघड केले.

पारदर्शक तपासासाठी महिला डीवायएसपींची नियुक्ती -

या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने तपास होण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोनाली कदम या अलिबाग येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. फरार आरोपींच्या शोधाकरिता पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. 17 वर्षीय मुलीवर गॅंगरेप करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नराधम सात आरोपींची व फरार आरोपींची नावे पत्रकारांना देण्यास पोलीस अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात खरोखर राजकीय दबाव आहे का, याची शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाच - Kirit Somaiya Criticized Sanjay Raut : 'संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.