ETV Bharat / state

जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनसाहित 100 बेडचे काम सुरू

author img

By

Published : Sep 1, 2020, 4:40 PM IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्याही 26 हजार पार झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे यापैकी 23 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 4 हजार जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर आतापर्यत 800 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

रायगड - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. असे असले तरी बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. कोरोना बाधीत रुग्णांना बेडची कमतरता पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जिकल विभागात 100 बेडचे अद्यावत असे जिल्हा कोविड सेंटर तयार करण्यात येत आहे. 40 बेड हे ऑक्सिजन यंत्रणेने तर 60 बेडला व्हेंटीलेटर, ऑक्सिजनयुक्त बनविण्यात आलेले आहे. सीएसआर फंडातून जिल्हा सामान्य रुग्णालयातच हे जिल्हा कोविड सेंटर बनविण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना बाधीत रुग्ण संख्येचा मुकाबला करण्यासाठी या कोविड सेंटरचा फायदा होणार आहे.

रायगडातील कोविड सेंटर
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्याही 26 हजार पार झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे यापैकी 23 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 4 हजार जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर आतापर्यत 800 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून या रुग्णांना उपचारादरम्यान बेडची व्यवस्था अपुरी पडू नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातच अतिरिक्त 100 बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांसाठी बेड कमी पडत आहेत. त्यादृष्टीने अलिबाग येथे जिल्हा कोविड सेंटर बनविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटर, ऑक्सिजनयुक्त 100 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून आठ ते दहा दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. सीएसआर फंडातून 80 बेडचे काम करण्यात येत आहे तर 20 बेडचे काम रुग्णालयामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा - कर्जफेडीचा कालावधी दोन वर्षांपर्यत वाढविणे शक्य; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.