पुणे : पुणे शहरात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आला ( Zika Patient Found in Pune City ) आहे. 18 नोव्हेंबरला 67 वर्षांच्या एका व्यक्तीत याची लक्षणे दिसून आली. पुणे जिल्ह्यातील बावधन इथं हा रुग्ण सापडला आहे. 16 नोव्हेंबरला हा रुग्ण पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या रक्ताचे नमुने खाजगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असात हा रुग्ण झिका बाधीत असल्याचे निश्चित ( What are the symptoms of Zika virus ) झाले.
रुग्णाचा तपशील : रुग्णाचे वय ६७ वर्षे आहे. १६२२ रोजी जन्म झाला. बावधन इथे रूग्ण राहतो. ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा याकारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. खाजगी प्रयोगशाळेत १८ नोव्हेंबर २०२२ रोजी झिका बाधित असल्याचे सिध्द झाले. दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एन आय व्ही पुणे यांच्या तपासणीत हा रुग्ण झिका बाधीत असल्याचे निश्चित झाले.
घरातील एकही संशयीत नाही : दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेच्यावतीने या भागात रोग नियंत्रण कार्ययोजना करण्यात आली. रुणाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यात एकही संशयित आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले तथापी या भागात एडीडास उत्पती नाही. या भागात धूर फवारणी करण्यात आली.
सूरत येथे गेला होता : सदर रुग्ण हा मूळचा नाशिकचा असून तो ६ नोव्हेंबर रोजी पुण्यात आलेला होता. त्यापूर्वी आक्टोबर २२ मध्ये तो सूरत येथे गेला होता. सध्या हा पूर्णपणे बरा झाला असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रूण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे.
रुग्ण हा मूळचा नाशिकचा : रुग्ण हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून 6 नोव्हेंबरला तो पुण्यात आला ( Zika Patient Originally From Nashik ) होता. त्याआधी तो 22 ऑक्टोबरमध्ये सूरत इथं गेला होता. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आलं आहे.
लक्षणे कोणती : एडिस जातीच्या डासांमुळे होणारा हौ सोम्यस्वरुपाचा आजार ( Zika virus Symptoms ) आहे. यात 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं आढळत नाहीत. इतर रुग्णांमध्ये तपा, अंगदुखी, डोळे येणे ही लक्षणं दिसून येतात. झिका संसर्गजन्य आजार नाही.आठवड्यातून किमान एकदा पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत, पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावं. घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. घराभोवती किंवा छतावर टाकाऊ साहित्य ठेवू नका.