ETV Bharat / state

व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवणे बेतले जीवावर; धारदार शस्त्रांनी तरुणाचा खून - जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे

यश आणि आरोपी ऋतिक यांच्यात काही महिन्यापूर्वी व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवण्यावरुन वाद झाला होता. हे प्रकरण पोलिसात गेले. मात्र, त्यानंतर हा प्रकार निवळला होता. त्यानंतर यश हा त्याच्या दोन मित्रांसह टाकावे गावाच्या बाहेर पायी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या सात जणांनी दोन मित्रांना पकडून ठेवत यशवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.

Murder
पकडण्यात आलेले मारेकरी
author img

By

Published : May 25, 2020, 12:22 PM IST

पुणे - व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झालेल्या वादातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून केल्याने खळबळ उडाली. ही घटना मावळ परिसरातील टाकावे गावात घडली. यश रोहिदास असवले असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुख्य सूत्रधार ऋतिक असवलेसह अजय जाधव, अतिश लंके, विकास रिठे, ऋतिक चव्हाण, अश्विन चोरगे, निखिल काजळे अशी बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगाव पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे.

खून झालेला यश आणि आरोपी ऋतिक यांच्यात काही महिन्यापूर्वी व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवण्यावरुन वाद झाला होता. हे प्रकरण पोलिसात गेले. मात्र, त्यानंतर हा प्रकार निवळला होता. परंतु, पुन्हा त्यांच्यात व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवण्यावरून वाद झाला. यश हा त्याच्या दोन मित्रांसह टाकावे गावाच्या बाहेर पायी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या सात जणांनी दोन मित्रांना पकडून ठेवत यशवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.

व्हाट्सअॅप स्टेट्स ठेवणे बेतले जीवावर; धारदार शस्त्रांनी तरुणाचा खून

धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात यश बेशुद्ध पडला. घटनास्थळावरून आरोपींनी पोबारा केला. दरम्यान, जखमी यशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळला भेट देऊन घटनेचा तपास सुरू केला. तेव्हा, मृत झालेल्या यश आणि आरोपी ऋतिक याचे भांडण झाल्याचे समोर आले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्याच्यासह सात जणांना अटक करण्यात आले. अवघ्या पाच तासात वडगाव पोलिसांनी घटनेचा उलगडा केला आहे.

व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन अगोदरही झाला होता गुन्हा दाखल

यश असवले आणि आरोपी ऋतिक यांच्यात या अगोदर देखील स्टेट्स ठेवण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रकरण शांत झाल्याचे नातेवाईक समजत होते. दरम्यान ही खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.