ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रचारासाठी युवक क्रांती दलाकडून पदयात्रा; सामाजिक संघटना सहभागी होणार

author img

By

Published : Nov 17, 2022, 2:22 PM IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या पदयात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहरात सुद्धा युवक क्रांती दल आणि काँग्रेस यांच्याकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

पुणे: खासदार राहुल गांधी यांच्या पदयात्रेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पुणे शहरात सुद्धा युवक क्रांती दल आणि काँग्रेस यांच्याकडून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कोथरूड भागातील गांधी भवन ते गुडलक चौक असा या पदयात्रेचा मार्ग असून 4.30 ला पदयात्रा सुरू होणारा असून यात अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या प्रचारासाठी युवक क्रांती दलाकडून पदयात्रा

लोकशाही जिवंत: खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते श्रीनगर ही भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातल्या काही ठराविक जिल्ह्यामध्ये ही यात्रा चालू आहे. त्यामुळे देशांमध्ये लोकशाही जिवंत आहे. देशांमध्ये विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. देशांमध्ये जे भीतीच वातावरण तयार केले जात होते. ते भीतीच वातावरण सध्या घालवण्यासाठी यात्रेचा खूप मोठा प्रभाव होत आहे.

आम्ही या यात्रेत सहभागी: एकप्रकारे देशांमध्ये पुन्हा एक स्वतंत्र चळवळ उभी टाकल्यासारखं वातावरण असल्याची सध्या स्थिती आहे, असा अनेक युवक क्रांतीजलांच्या कार्यकर्त्यांना वाटतं म्हणून त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या यात्रेत सहभागी सुद्धा झालेलो आहोत. आमची काही कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, अशी माहिती युवक क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्याने दिलेली आहे.

सरकार विरोधात बोलण्यावर दबाव: युवक क्रांती दलाचे अन्वर राजन यांनी यात्रेच्या मागची भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, देशात स्वातंत्र्यवर जो गदा आणला जात होता. त्यामधील लेखकावर दबाव आणला जात होता. सरकार विरोधात बोलण्यावर दबाव आणला जातो. त्या देशात धर्माधर्मामध्ये विषपेरण्याचा जो प्रकार चालू आहे. त्या सर्वांवर कोणीतरी बोललं पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. परंतु तो आवाज उठत नव्हता. यात्रेच्या माध्यमातून ते होते. त्यामुळे यात्रेला सर्वपक्षीयाने सर्वसामाजिक संघटनाने स्वातंत्र्य मानणाऱ्या संघटनेने पाठिंबा दिला पाहिजे. ही आमची भूमिका असल्याचे अन्वर राजन यांनी म्हटलेलं आहे.

यात्रेची जनजागृती: यात्रेचा जो महाराष्ट्रातील मार्गक्रमण आहे. ते ठराविक जिल्ह्यात आहे, कारण यात्रा प्रत्येक जिल्ह्यात येणे शक्य नाही. परंतु या यात्रेत मधल्या भूमिका यात्रेत का गेलं पाहिजे ? यात्रेला का पाठिंबा द्यावा ? यासाठी पुण्यातल्या लोकांनी सुद्धा सहभागी व्हावं. त्या यात्रेची जनजागृती व्हावी. लोकशाही लोकांना कळावी, यासाठी आम्ही ही यात्रा काढलेली आहे. यात सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे, अशी युवक क्रांती दलाची आवाहन आहे. यात अनेक पुण्यातील सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.