पुणे - देहूगावात धक्का मारल्याचे कारण विचारल्याने एकाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याचे घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना देहूगाव झेंडेमळा येथील चायनीज सेंटरवर दोन दिवसांपूर्वी घडली असून रविवारी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
स्वप्नील विलास बानेकर (वय- 25), असे जखमी तरुणाचे नाव असून देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे, तर स्वप्नील दिलीप परंडवाल, असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याला देहूरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावातील अमोल चायनीज सेंटरवर आरोपी हा दारू प्यायला बसला होता. तेव्हा, तक्रारदार स्वप्नील तिथे आला. काही कारण नसताना आरोपी शुभमने स्वप्नीलला धक्का दिला. याचे कारण विचारले असता थेट शुभमने बिअरची बॉटल स्वप्नीलच्या डोक्यात फोडली. यात तो रक्तबंबाळ झाला होता. याप्रकरणी त्याने देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुभमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कणसे हे करत आहेत.
...अन् धक्का मारल्याचे कारण विचारताच डोक्यात फोडली बिअरची बाटली - pune latest crime news in dehugaon
स्वप्नील विलास बानेकर (वय- 25) असे जखमी तरुणाचे नाव असून देहूरोड पोलिसात तक्रार दिली आहे, तर स्वप्नील दिलीप परंडवाल, असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याला देहूरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
![...अन् धक्का मारल्याचे कारण विचारताच डोक्यात फोडली बिअरची बाटली youth injured in bear bottle attacks at dehugaon at pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11:27:08:1597039028-mh-pun-01-av-dehu-attack-mh10024-10082020111632-1008f-1597038392-60.jpg?imwidth=3840)