ETV Bharat / state

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसतर्फे राज्यभर सह्यांची मोहीम

आएएस अधिकारी तुकाराम मुंढे ( IAS Tukaram Mundhe ) यांची आरोग्य विभागातून बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आतच मुंढे यांचा कार्यभार काढला गेला आहे. 16 वर्षात 19 वेळा तुकाराम मुंढे यांची बदली केली गेली आहे. तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ युवक कॉंग्रेसच्यावतीने राज्यभर सह्यांची मोहिम ( Youth Congress signature campaign ) राबविण्यात येणार आहे.

author img

By

Published : Dec 4, 2022, 10:44 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे ( IAS Tukaram Mundhe ) यांची आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून पुन्हा बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. मुंडे यांच्या बदलीनंतर राज्यभर मुंडे यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संस्था संघटनाच्या वतीने सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आजपासून युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभर मुंडे यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहिमेला ( Youth Congress signature campaign ) पुण्यातून सुरूवात झाली आहे.

युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ बोलताना

तुकाराम मुंढेची पुन्हा बदली: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून पुन्हा बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वीच स्पटेंबर 2022 तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आतच मुंढे यांचा कार्यभार काढला गेला आहे. 16 वर्षात 19 वेळा तुकाराम मुंढे यांची बदली केली गेली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांना आरोग्य विभागाचे कारभार पुन्हा देण्यात यावे, यासाठी ही सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे, असे यावेळी युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितल आहे.

समर्थनार्थ सह्यांची मोहिम: आजपासून पुण्यातील अलका चौक येथून या सह्यांच्या मोहीमेला सुरू करण्यात आलेली आहे. राज्यभर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागात शिस्त आणण्याचं काम मुंडे करत होते. आणि त्यांची बदली करण्यात आल्याने जी शिस्त लागली होती ती शिस्त आत्ता बिघडणार आहे. युवक काँग्रेसकडून आमची मागणी आहे की, मुंडे यांची बदली ही रद्द करण्यात यावी आणि मुंडे यांना पुन्हा आरोग्य विभाग प्रमुख करण्यात यावे, असे देखील सुरवसे पाटील यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.