पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप करत बुधवारी (दि. 3 फेब्रु.) युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील शारदा गणपती मंदिर येथी मोदी सरकारला सद्बुद्धी द्या, अशी प्रार्थना केली. तसेच प्रसाद म्हणून गाजरचे वाटप केले, अशी माहिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिली
अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून तरुणांसाठी एकही तरतूद करण्यात आलेली नाही. देशात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार होत असतानाही मोदी सरकार तरुणांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना केवळ दीडपट हमीभावाची घोषणा केली व तरुणांसाठी कशाचीही तरतूद केली नाही. केंद्र सरकारकडून शेतकरी व तरुणांना गाजर दाखवण्यात आल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर प्रसाद म्हणून गाजरचे वाटप केले.
हेही वाचा - बैलगाडीचा कासरा हातात घेऊन अमित ठाकरेंनी दिला शेतकरी संदेश..!