पुणे - दुष्काळी संकट आणि सध्या परतीच्या पाऊस, अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात 5 नोव्हेंबरला (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास खेड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धनंजय बाळु मस्के, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
खेड तालुक्यातील किवळे गावात राहणारे मस्के कुटुंब हे अवघ्या 27 गुंठे शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, शेतीत काही पिकत नव्हतं. शेतीला कोणता जोडव्यवसायही नव्हता. त्यामुळे मस्के कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यात मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा होता.
धनंजयने शेतीसोबतच नोकरी करण्यासही सुरूवात केली होती. तरीही कर्जाचा डोंगर कमी होत नव्हता. याच निराशेतून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.