पुणे : पुण्यात कधी कोणती घटना घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. येथे अशा काही घटना घडत असतात की त्यामुळे लोकही चक्रावून जातात. अशीच काहीशी घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.
महिलेबाबत अश्लील शब्द वापरला : पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत एका इसमाने सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेबाबत अश्लील शब्द वापरला. एवढेच नाही तर त्याने चक्क सोसायटीच्या १४० सदस्यांना तसा ई-मेलही पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणाऱ्या इसमाने ई-मेलवरून एका व्यक्तीला त्याचे नाव लिहून, 'तुझी बायको पॉर्न अॅक्ट्रेससारखी दिसते', असे म्हटले. तो ई-मेल त्याने सोसायटीतील सर्व सदस्यांना पाठवला.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या घटनेनंतर ती व्यक्ती मेल पाठवणाऱ्याला या प्रकरणी जाब विचारण्यास गेला असता त्याने त्याच्याशी धक्काबुक्की केली. तसेच त्याने त्या व्यक्तीला तुला काय करायचे ते कर, असे धमकावले. त्यानंतर सदर महिलेने या घटनेबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, पोलिसांनी मेल पाठवणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
महिलांच्या ऑनलाईन छळाचे प्रमाण वाढले : गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या अती वापरामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. हा गुन्हा विनयभंगाच्या प्रकारात मोडतो, जे ऑनलाईन माध्यमातून केले गेले. गेल्यावर्षी 'बुल्ली बाई' नावाचे एक प्रकरण फार गाजले होते. 'बुल्ली बाई' नावाच्या अॅपवर महिलांची ऑनलाईन बोली लावण्यात आली होती. या अॅपवर काही प्रसिद्ध महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय अपलोड करण्यात आले होते. हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून घेण्यात आले होते. हे फोटो अॅपवर अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात आला होता. अॅपने प्रत्यक्षात कोणालाही विकले नाही, परंतु याचा उद्देश या महिलांचा छळ आणि अपमान करण्याचा होता.
हे ही वाचा :