ETV Bharat / state

बारामतीत तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - police suicid in baramati

शहरातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सानप यांना काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न झाले होते. याचा आनंद त्यांनी सोशल मीडिया वरून सर्वत्र व्यक्त केला होता. मात्र अवघ्या १५ दिवसांतच त्यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

बारामतीत तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : May 12, 2020, 7:46 AM IST

बारामती (पुणे) - शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका तरुण पोलीस कर्मचार्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. तुषार सानप (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

शहरातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सानप यांना काही दिवसांपूर्वीच कन्यारत्न झाले होते. याचा आनंद त्यांनी सोशल मीडिया वरून सर्वत्र व्यक्त केला होता. मात्र अवघ्या १५ दिवसांतच सानप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टाळेबंदीच्या काळात तुषार सानप यांनी पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. बारामती शहरात सुरुवातीला त्यांनी गुन्हे शोध पथकात काम केले. गेल्या अडीच वर्षापासून ते बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.