पुणे: सहकारनगर पोलीस ठाण्यात मुळ सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 16 ऑगस्ट ते 28 ऑक्टोबर 2021 यादरम्यान घडला. त्यानुसार आरोपी अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर, अनोळखी मोटारचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलात्कारानंतर लावले लग्न : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. त्याने एके दिवशी तरुणीला घरी बोलावले होते आणि कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडित महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये अभिमन्यूचा मित्र प्रशांत कोळी आणि वाहनचालक यांनी तिला ठाण्याला नेले आणि जबरदस्तीने अभिमन्यूसोबत लग्न लावले.
आरोपीविरुद्ध तक्रार: पीडित महिलेने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता अभिमन्यूचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडील दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. यासह पीडितेच्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तरुणीने भीतीपोटी तेव्हा तक्रार दाखल केली नव्हती; पण पोलिसांनी तिला धीर दिल्यानंतर तिने या आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बस चालकाचा बलात्कार : पुण्यात बलात्काराची ही पहिलीच घटना नाही. तर यापूर्वी 18 जुलै, 2022 रोजी कोंढवा पोलीस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. पुण्यातील वडाची वाडी परिसरात राहणार्या 15 वर्षीय मुलीवर बस चालकाने बलात्कार केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमेश्वर घुले पाटील (वय, 35 रा.वडाची वाडी) या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
म्हणाला, आपण रिलेशनशिपमध्ये राहूयात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमेश्वर घुले पाटील याची स्कूल बस होती. आरोपीच्या बसमधून ती पीडित मुलगी शाळेसाठी जात असायची. त्यामुळे आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. त्या ओळखीमधून आरोपीने पीडित मुलीस म्हणाला की, आपण रिलेशनशीपमध्ये राहूयात. नेमके रिलेशनशीप काय प्रकार असतो. हे पीडित मुलीस माहिती नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्यावर मार्च आणि जून दरम्यान अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला.
हेही वाचा : Twitter Blue Tick :भारतात ट्विटरच्या ब्लू टिक सबस्क्रिप्शनला सुरूवात, शुक्ल रचना जाणून घ्या