पुणे - लिफ्ट दिलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे केल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. आश्रप सय्यद (वय 20) असे आरोपीचे नाव आहे. खडकी पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
एका युवतीला पुण्याहून खडकीला जायचे होते. त्या तरूणीने येरवड्यावडे जाणाऱ्या एका युवकाला लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने त्यानेही लिफ्ट दिली. मात्र, त्याने तरूणीला खडकीला न सोडता मध्येच सोडू लागला. यानंतर तिने येरवड्यात सोडण्याचा आग्रह धरला. मात्र, त्यानंतर दोघात काही तरी झाले आणि ते दोघे एका इमारतीच्या छतावर गेले. वर गेल्यावर दोघांमध्ये अश्लील चाळे सुरू झाले. यावेळी या तरूणीने तरुणाकडे 5 हजारांची मागणी केली. यानंतर दोघांत वाद झाला आणि तरूण आरोपी आश्रफ सय्यदने तिला तिसऱ्या मजल्यावरून तिला खाली फेकले.
हेही वाचा - सीआरपीएफ जवानांनी एकमेकांवरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती
घटनेत ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. आरोपीने तिचा मृतदेह खडकी पोलिसांच्या हद्दीतील एका पुलाखाली नेऊन टाकला. मात्र, एक दिवसानंतर तो पोलिसांना शरण आला आणि या खुनाचा उलगडा झाला. तर आश्रफ सय्यद (वय 20) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.