पुणे - भारतासह संपुर्ण जगात आज 5 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातही योग दिनाला सुरुवात झाली आहे. हजारो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
योगासनाचे महत्त सांगून प्रात्यक्षिके केली जात आहेत. शहरात विविध महाविद्यालये, कार्यालयातही योग दिनाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयटी महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी एकत्र येत योगा केला.