ETV Bharat / state

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात - yavat police arrested accused

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव येथे ६ डिसेंबरला एका व्यक्तीची सोन्याच्या दोन चैन आणि दुचाकी चोरीची घटना घडली होती.

pune
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या यवत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
author img

By

Published : Dec 13, 2019, 9:43 PM IST

पुणे - जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव येथे ६ डिसेंबरला एका व्यक्तीची सोन्याच्या दोन चैन आणि दुचाकी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी अटक केलेल्या या आरोपीवर खून, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरला दिलीप लक्ष्मण चौधरी (रा.सोरतापवाडी, ता.हवेली) हे त्यांची दुचाकीवरून (एम.एच.१२/ के.झेड/९५०८) नातेवाईकाच्या लग्नासाठी दौंड तालुक्यातील पारगाव येथे आले होते. लग्नानंतर ते मोटार सायकलवरून निघाले होते. त्यावेळी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी गावच्या हद्दीतील पंडीता रमाबाई मुक्ती मिशनच्याजवळ असलेल्या उड्डाण पुलावर आले असता थंडी वाजू लागल्याने त्यांनी मोटार सायकल रस्त्याच्या बाजूला ठेवली. त्याठिकाणी ते गाडीतून स्वेटर काढत होते. आरोपीने त्यांच्याशी झटापट करत त्यांना मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याच्या दोन चैन हिसकावून त्यांना धक्का दिला आणि त्यांच्या दुचाकीसह १ लाख ६ हजारांचा ऐवज लंपास केला.

हेही वाचा - मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू

गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी त्यासंबंधीत तपास करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने तपास करून आरोपी माऊली उर्फ भावड्या उर्फ भाऊ मच्छिंद्र बांदल (रा.पारगाव) याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेली दुचाकी आणि सोन्याची चैन, असा एकूण ९५ हजारांचा मुददेमाल जप्त केला. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - तिरुपती ते बारामती ५५ तासात सायकलवरुन प्रवास, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याच्या अनोखा उपक्रम

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. सचिन बारी आणि पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, गणेश पोटे, दशरथ बनसोडे. पोलीस कॉन्स्टेबल दामोदर होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:nullBody:जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगार जेरबंद"

दौंड
दौंड तालुक्यातील केडगाव येथे ६ डिसेंबर रोजी एका व्यक्तीची सोन्याच्या दोन चेन आणि दुचाकी चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारास यवत पोलिसांनी अटक केली आहे . या आरोपी वर खुन, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,

०६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास याती दिलीप लक्ष्मण चौधरी,( रा.सोरतापवाडी, ता.हवेली, जि.पुणे) हे त्यांची शाईन मोटार सायकल
नंबर एम.एच.१२/ के.झेड/९५०८ वरून त्यांचे पाहुणे स्वप्नील काळे यांचे लग्नाच्या कार्यक्रमासाठी दौंड तालुक्यातील
पारगांव येथे आले होते. लग्नाचा कार्यक्रम झाले नंतर ते मोटार सायकल वरून सोरतापवाडी (ता
हवेली ) येथे जाणेसाठी चौफुला बाजुकडे निघाले होते . त्यावेळी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास ते
बोरीपार्धी (ता.दौंड ) गांवच्या हददीतील पंडीता रमाबाई मुक्ती मिशनचे जवळ असलेल्या ब्रिजवर आल्यावर
त्यांना थंडी वाजू लागलेने त्यांनी मोटार सायकल रोडचे बाजूला उभी करून मोटार सायकलच्या डिक्कीतुन
स्वेटर काढत असताना तेथे त्यांचे जवळ एक अनोळखी इसम आला व तो फिर्यादीस म्हणाला की,
"तुम्ही कुठले आहेत, तुम्ही कोठे चालला' असे म्हणून त्याने अचानक फिर्यादीशी झटापट, मारहाण
करून फिर्यादीचे गळयातील दोन सोन्याची चैनी जबरदस्तीने काढुन घेतल्या आणि फिर्यादीस ढकलुन देऊन
फिर्यादीची शाईन मोटार सायकल नं.एम.एच.१२ / के.झेड/९५०८ ही जबरदस्तीने घेवून चोरून नेली .

असा एकुण किं.रू.१,०६,०००/- चा ऐवज घेवुन निघून गेला होता. याबाबत
यवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०८१/२०१९ भा.दं.वि.का.क. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हा गंभिर स्वरूपाचा असल्याने वरीष्ठांनी तात्काळ तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या .
त्याप्रमाणे यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी तपास
पथकास गुन्हा तात्काळ उडाकीस आणणे बाबत सांगितले .तपास पथकाने तपास करून गुन्हयात आरोपी अटक करण्यात आलेला आहे. माउली उर्फ भावडया उर्फ भाउ मच्छिंद्र बांदल . (रा.पारगांव, ता.दौंड, जि.पुणे.) यास गुन्हयात अटक करून त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली फिर्यादीची शाईन मोटार
सायकल नं.एम.एच.१२/ के.झेड/९५०८ व फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन असा एकुण किं.रू.
९५,०००/- चा मुददेमाल गुन्हयात जप्त केला आहे . यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर खुन, चोरी तसेच जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली .

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना , उप.विभागिय पोलीस अधीकारी डॉ. सचिन बारी आणि पोलीस निरीक्षक भाऊसाहेब
पाटील यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन लकडे, पो.ना.गणेश पोटे, दशरथ
बनसोडे. पो.कॉ.दामोदर होळकर यांचे पथकाने केलेली आहे.
अशी माहिती यवत पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली .
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.