ETV Bharat / state

Seized Cannabis Worth 30 Lakh : पाटस जवळ यवत पोलिसांनी जप्त केला 30 लाखांचा गांजा, 12 अटकेत - यवत पोलिसांनी जप्त केला 30 लाखांचा गांजा

यवत पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील ( Pune Solapur Highway ) पाटस जवळ आंतरराज्य व राज्यांतर्गत गांजाची वाहतूक व विक्री करणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून एकूण 30 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त ( Seized Cannabis Worth 30 Lakh ) केला आहे. या प्रकरणी सात पुरुष व पाच महिला, असे एकूण बारा आरोपी अटक ( Yavat Police Arrested Twelve Accused ) केले आहेत.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 26, 2021, 4:29 PM IST

Updated : Dec 26, 2021, 5:19 PM IST

दौंड (पुणे) - यवत पोलिसांनी सापळा रचून पुणे-सोलापूर महामार्गावर ( Pune Solapur Highway ) आंतरराज्य व राज्यांतर्गत गांजाची वाहतूक व विक्री करणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून एकूण 30 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त ( Seized Cannabis Worth 30 Lakh ) केला आहे. तसेच या प्रकरणी सात पुरुष व पाच महिला, असे एकूण बारा आरोपी अटक ( Yavat Police Arrested Twelve Accused ) केले आहेत. यवत पोलीस ठाण्याचे ( Yavat Police Station ) पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.

पाटस जवळ यवत पोलिसांनी जप्त केला 30 लाखांचा गांजा

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दोन मालवाहतूक ट्रक आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून पुणे येथे गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी छापा घालण्यासाठी दोन पथके तयार केली. तसेच कायदेशीर बाबी पंच आदी बाबींची पूर्तता करून रविवारी (दि. 26 डिसेंबर) पहाटे 1:35 वाजण्याच्या सुमारास पाटस गावापासून काही अंतरावर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंप व राजश्री व्हेज हॉटेलच्या विरुद्ध बाजूस पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हीस रोडच्या कडेला सापळा लावला. ट्रक क्रमांक (ए पी 16 टि जी 2256) व (ए पी 07 टी एम 7799), असे वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेतले. यवत पोलिसांनी दोन्ही वाहनांची पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये आरोपींनी ड्रायव्हरच्या बाजूला एकूण सहा पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या बंद पाकिटात 167.25 किलोग्रॅम वजनाचा एकूण 30 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. गुन्ह्यात वापरलेले दोन मालवाहतूक ट्रक अंदाजे किंमत 48 लाख रुपये, असा एकूण 78 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यामध्ये आरोपी रविशकुमार जोगेश्वराव पुपल्ला (रा. झमीदागुमील्ली, वागूमील्ली, जिल्हा- कृष्णा,राज्य - आंध्र प्रदेश), रवीकोट्या अजमेरा (रा. विजयवाडा, ता. कखीपाट , जि. कृष्णा, राज्य - आंध्रप्रदेश), उमेश खंडू थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), युवराज किसन पवार (रा. मुथळा, जि. बुलडाणा), उत्तम काळू चव्हाण (रा. करवंड, ता. चिखली, जि. बुलडाणा), प्रकाश एन व्यंकटेश्वराव (रा. विजयवाडा, ता. कखीपाट , जि. कृष्णा, राज्य - आंध्रप्रदेश ), किसन शालिमार पवार ( रा. मुथळा, जि. बुलडाणा ), रुक्मिणीबाई रुपराव पवार ( रा. ढाकरखेड, ता. चिखली, जि. बुलडाणा), मीना युवराज पवार ( रा.- ढाकरखेड, ता. चिखली, जि. बुलडाणा), ममता उत्तम चव्हाण (रा. करवड, ता.चिखली, जि. बुलडाणा), लालाबाई देवलाल चव्हाण (रा. चिखली, ता. चिखली, जि. बुलडाणा), ललिता हिरालाल पवार (रा. ढाकरखेडा, ता. चिखली, जि. बुलडाणा), असे एकूण सात पुरुष व पाच महिला, असे एकूण बारा आरोपी अटक केले आहेत. एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा - Wrestler Shot Dead In Pune : चाकणमध्ये पैलवानाची गोळ्या झाडून हत्या

Last Updated : Dec 26, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.