पुणे - आजपर्यंत मांजरीचे अनेक प्रकार आपण पहिले असतील. अनेक जाती तसेच विविध आकाराच्या मांजरी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मांजर आणि कुत्रे तसेच पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. या पाळीव प्राण्यांसाठी पाहिजे ती किंमत देखील मोजली जाते. प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी नुकतेच पुण्यात मांजर आणि कुत्रे यांचा पेटगाला ह्या पेट शोच आयोजन करण्यात आलं होत. (petgala in pune). यात मोठ्या प्रमाणात विविध जातीचे मांजर आणि कुत्रे यांचा समावेश होता. या पेट शो मध्ये जगातील सर्वात मोठी मांजर आली होती. (Worlds Biggest Cat).
![Worlds Biggest Cat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-03-world-largest-cat-avb-7210735_13112022161836_1311f_1668336516_849.jpg)