ETV Bharat / state

वीजवितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचा दरवाजा चोरताना महिला सीसीटीव्हीत कैद - Baramati Latest News

बारामतीच्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या रत्नाकर बँकेसमोरील वीजवितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या दरवाजाची चोरी करताना दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Female thief imprisoned on CCTV
डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या दरवाजाची चोरी
author img

By

Published : Nov 30, 2020, 10:27 PM IST

बारामती - बारामतीच्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या रत्नाकर बँकेसमोरील वीजवितरण कंपनीच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या दरवाजाची चोरी करताना दोन महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा प्रकारच्या भुरट्या चोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील नागरिकांच्या घराबाहेर असणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू, तसेच दुकानाच्या समोरील वस्तू चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. अशा भुरट्या चोर्‍या करणार्‍या महिलांना सजग नागरिकांकडून हटकले असता त्यांना अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे पोलिसांनीच आता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चोरी करताना महिला सीसीटीव्हीत कैद

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

शहरातील प्रमुख रस्त्यांवर असणाऱ्या व्यवसायिक दुकानदारांकडून नगरपालिका मोठ्या प्रमाणात कर वसूल करते. मात्र त्याबदल्यात नगरपालिकेकडून कुठल्याही सुविधा देण्यात येत नाहीत. कमीत कमी नगरपालिकेकडून रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे तरी बसवावेत, त्यामुळे चोरींच्या घटना होणार नाहीत. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

किरकोळ चोरीसाठी जीव धोक्यात

सीसीटीव्हीत कैद झालेल्या या महिला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, विद्युत पुरवठा चालू असणाऱ्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचा दरवाजा काढून नेताना दिसत आहेत. यातून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना देखील घडू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.