ETV Bharat / state

Woman Rape Case Pune : लग्न आणि नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; 2 वर्षानंतर गुन्हा दाखल - lure of marriage and govt job

शासकीय नोकरी आणि लग्नाचे आमिष (lure of marriage and govt job) एका महिलेच्या चांगलेच अंगलट आलेला आहे. कारण या आमिषाला बळी पडून त्या महिलेवर एका व्यक्तीने वारंवार बलात्कार (Woman Rape Case Pune) केल्याची घटना तब्बल दोन वर्षांनंतर समोर आली. (Latest news from Pune) याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

Woman Rape Case Pune
महिलेवर बलात्कार
author img

By

Published : Jan 1, 2023, 5:57 PM IST

पुणे : एका विवाहित महिलेवर पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने वारंवार बलात्कार (Woman Rape Case Pune) करून तिची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मु पो. मेढा, जावळी, सातारा) (lure of marriage and govt job) याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest news from Pune) 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

असहायतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार: याबाबत अधिक माहिती अशी की या महिलेच्या घरामध्ये काही अंतर्गत वाद सुरू असताना आरोपीने त्याचा गैरफायदा घेऊन हा सगळा प्रकार केला आहे. पीडित महिला ही पुण्याची असून आरोपी सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीने फिर्यादीला पुणे महानगरपालिकेत नोकरी लावतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला वेगवेगळी आमिष दाखवून आठ लाख 68 हजार रुपये रोख रक्कम तिच्याकडून घेतले. दरम्यान फिर्यादीच्या असहायतेचा आणि घरी झालेल्या वादाचा गैरफायदा ही आरोपीने घेतला. तिला लग्नाचे आमिष दाखवून डेक्कन पवेलियन हॉटेल या ठिकाणी बोलावून घेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

पीडितेची आर्थिक फसवणूक : 2019 ते 2021 या सर्व कालावधीत हा सर्व प्रकार घडत होता. आरोपीने या कालावधीत फिर्यादीला नोकरी न लावता तसेच तिच्यासोबत लग्न न करता तिची आर्थिक फसवणूक केली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.