ETV Bharat / state

वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून महिलेचा केला खून; बहीण-भावाला अटक - pune

वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील एका महिलेला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी बहीण भावा विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या मृत महिलेला दवाखान्यातून परस्पर नेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची कुजबूज मागील काही दिवसांपासून बारामती शहरात सुरू होती.

Woman murdered on father's immoral suspicion
वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून महिलेचा केला खून
author img

By

Published : Nov 23, 2021, 6:50 PM IST

Updated : Nov 23, 2021, 7:41 PM IST

बारामती - वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील एका महिलेला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी बहीण भावा विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या मृत महिलेला दवाखान्यातून परस्पर नेऊन तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची कुजबूज मागील काही दिवसांपासून बारामती ( Baramati ) शहरात सुरू होती.

मुलांनी वडिलांना आणि महिलेला केली काठीने मारहाण -

ऋषिकेश प्रमोद फरतडे, अनुजा प्रमोद फरतडे (दोघे राहणार कसबा, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदर घटनेप्रकरणी डॉ. सुनील रामदास पवार (रा, माळेगाव खुर्द ता.बारामती) यांनी फिर्याद दिली. डॉ. पवार यांचे बारामती शहरात हॉस्पिटल आहे. व ते फडतरी कुटुंबीयांच फॅमिली डॉक्टर आहेत. दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान फिर्यादी डॉक्टर पवार हे घरी असताना संशयित आरोपी अनुजा फरतडे हिने फोन करत वडिलांना एका महिलेसोबत जुन्या वाड्यात पकडले आहे. व त्या दोघांना मी व भाऊ ऋषिकेश यांनी काठीने मारले केली आहे, असे सांगितले. त्यावर फिर्यादी डॉक्टर पवार यांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला.

मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगण्याची केली विनंती -

दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता अनुजा हिने संबंधित महिलेचा श्वास चालत नसून तिला ऋषिकेश याने बारामतीतील एका खाजगी दवाखान्यात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी महिला मयत झाल्याचे सांगितले. सदर महिलेला दवाखान्यात नेण्यापूर्वी अनुजा हिने फिर्यादी डॉक्टरांना फोन करत आम्ही संबंधित महिलेच्या नातेवाईकांना तुमच्या दवाखान्यात घेऊन येतो. तुम्ही तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगा अशी विनवणी केली. मात्र, फिर्यादी डॉक्टर पवार यांनी त्यास नकार दिला.

डॉक्टरांनी सांगितले -

दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास ऋषिकेश हा रुग्णवाहिकेतून मृत महिलेला घेऊन फिर्यादी डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यातील पार्किंगमध्ये आला. तेथे डॉक्टर पवार यांनी सदर महिलेचा चेहरा पाहिला असता ती चार ते पाच तासांपूर्वीच मरण पावल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्या महिलेला उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलाने डॉक्टर पवार यांची भेट घेत माझ्या आईचा मृत्यू नेमका कशाने झाला अशी विचारणा केली. डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलालाही शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तद्नंतर संबंधित महिलेला रुग्णवाहिकेतून नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

बहिण भावाने मारहाण केल्याची दिली कबुली -

दरम्यान, या घटनेत संशयित आरोपींच्या वडिलांनाही मार लागला होता. संशयितांच्या वडिलांवर फिर्यादी डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यात उपचार सुरू होते. व ते १९ नोव्हेंबर पर्यंत सदर दवाखान्यातच होते. त्यावेळी मुलीने व मुलाने मारहाण केल्याचे सांगितले. २२ नोव्हेंबर रोजी डॉक्टर पवार यांना संबंधित महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चौकशी कामी बोलविण्यात आले होते. यावेळी डॉक्टर पवार यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बहिण भावाने मारहाण केल्याची कबुली दिली. तसेच मृत महिलेचा मोबाईल व वडिलांचे रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकल्याचे सांगितले. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

हेही वाचा - हत्येचा धक्कादायक उलगडा; दाराच्या फटीतून सबंध बघतो म्हणून केली रिक्षाचालकाची हत्या

Last Updated : Nov 23, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.