ETV Bharat / state

पुण्यात पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेने केली आत्महत्या

author img

By

Published : Dec 2, 2020, 10:27 PM IST

पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २७ नोव्हेंबरला वारजे माळवाडी परिसरात घडली. मनीषा रमेश कदम (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी मनीषा यांचे पती रमेश नारायण कदम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

पुणे - पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर महिलेने भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २७ नोव्हेंबरला वारजे माळवाडी परिसरात घडली. मनीषा रमेश कदम (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी मनीषा यांचे पती रमेश नारायण कदम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनीषा यांच्या आई मालन अलसे यांनी फिर्याद दिली होती.

मनीषा या स्त्रीरोग तज्ञ होत्या, तर त्यांचे पती डॉक्टर आहेत. सातारा जिल्ह्यातील मेढ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. रमेश नेहमी दारूच्या नशेत मनीषा यांना मारहाण करत असे. तसेच, चारित्र्याच्या संशयावरून त्यांना शिवीगाळही करत असे. मनीषा यांना अनेकदा उपाशीही ठेवण्यात आले होते. दरम्यान, आरोपी रमेश याने मनीषा यांना माहेरी नेऊन सोडले आणि पुन्हा परत आणले नाही. त्यामुळे, मागील काही महिन्यांपासून त्या माहेरीच वास्तव्यास होत्या.

कोविड काळात मनीषा यांनी महापालिकेच्या रुग्णालयात काम केले होते. त्यांनी एकाच दिवशी दहा महिलांची प्रसुती केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांची सासरच्या मंडळीसोबत एक बैठकही झाली होती. त्यावेळी आरोपी रमेश याने मनीषा यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीसोबत राहात होती, तर लहान त्यांच्यासोबत राहात असे. पतीसोबतच्या भांडणामुळे त्यांना मोठ्या मुलीला भेटताही येत नव्हते. यामुळे मागील काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मनीषा यांनी 27 नोव्हेंबर रोजी वारजे माळवाडी परिसरातील घरात भुलीच्या लसीचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. कथले करीत आहे.

हेही वाचा - बापदेव घाटात लुटणाऱ्यांना बारामती पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.