पुणे - जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील एका महिलेने पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर सोमवारी ( दि.२१) रोजी सकाळी या महिलेने पुन्हा तिन बाळांना जन्म दिला आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डाॅ. पोथरकर यांनी सांगितले.
हिवरेखुर्द येथील जोस्त्ना विठ्ठल वायकर यांनी पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मूल होणे शक्य नव्हते. मात्र त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी चौदानंबर येथील श्री हाॅस्पीटल या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर ते उपचारासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना डाॅ अविनाश पोथरकर व डाॅ मुक्तांजली पोथरकर यांनी दिलासा दिला व होमिओपाथी उपचार सुरू केले. या उपचाराने त्यांना पुन्हा दिवस गेले त्यानंतर त्यांनी दोनवेळा सोनोग्राफी केली त्यावेळी त्यांना सोनोग्राफीत तिन मुले असल्याचे आढळून आले. त्यामुळे डाॅक्टरांची चिंता वाढली होती, डाॅ. पोथरकर यांनी त्यांच्या अभ्यासानुसार होमिओपाथीचे उपचार पुढे तसेच सुरू ठेवले व त्यानंतर जोस्ना यांना बाळंतपणासाठी डाॅ. पोथरकर यांनी हाॅस्पीटला दाखल करुन घेतले. सोमवारी (दि २१) सकाळी जोस्त्ना यांनी तिन बाळांना सुखरुप जन्म दिला आहे. एकाच वेळी तिन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मिळ घटना आहे. बाळ व बाळंतीण सुखरुप असल्याचे डाॅ. पोथरकर यांनी सांगितले.