ETV Bharat / state

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग अ‌ॅपवरून 16 तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड

author img

By

Published : Feb 2, 2021, 6:55 PM IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी तपास अधिक गतीने करत तरुणीला जाळ्यात ओढण्यासाठी बंबल या डेटिंग अ‌ॅपवरून बनावट फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणीशी संपर्क केला. तरुणीनेही पोलिसांच्या बनावट रिक्वेस्टवरील व्यक्तीशी बोलण्यास सुरुवात केली. संशय येऊ नये म्हणून काही काळ हे संभाषण असेच सुरू ठेवले आणि तरुणीला भेटायला बोलवून पोलिसांनी सापळा रचून तरुणीला बेड्या ठोकल्या.

पुणे तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड
पुणे तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना डेटिंग अ‌ॅपवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून गंडा घालणाऱ्या 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही तरुणी तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांना मद्यातून बेशुद्धीच्या गोळ्या देत असे. ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने घेऊन पळ काढत असे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. आत्तापर्यंत 16 तरुणांना तिने गंडा घातल्याचे समोर आले आहे. तरुणी नेटफ्लिक्सवरील चित्रपट पाहून असे कृत्य केल्याचे तिने पोलिसांना सांगितले असून तिच्याकडून 15 लाख 25 हजारांचे 29 तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग अ‌ॅपवरून 16 तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड
डेटिंग अ‌ॅपवरून तरुणी तरुणांना जाळ्यात ओढत असे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड आणि पुण्यातील चंदनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात तरुणाला हॉटलेमध्ये बोलावून त्यांना मद्यातून बेशुद्धीच्या गोळ्या देऊन आर्थिक लूट करत असे. चेन्नई येथील तरुणाला बंबल या डेटिंग अ‌ॅपवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याला वाकड परिसरात एका मोठ्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तिथे दोघांची भेट झाली. त्यादरम्यान, तरुणाच्या नकळत तरुणीने बेशुद्धीच्या गोळ्या टाकलेले मद्य देऊन तरुणाला बेशुद्ध केले आणि त्याच्या जवळील पैसे, मोबाईल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हेही वाचा - पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याद्वारे अनेक डिजिटल उपक्रम

अशी केली तरुणीला अटक

फिर्यादीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी तपास अधिक गतीने करत तरुणीला जाळ्यात ओढण्यासाठी बंबल या डेटिंग अ‌ॅपवरून बनावट फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणीशी संपर्क केला. तरुणीनेही पोलिसांच्या बनावट रिक्वेस्टवरील व्यक्तीशी बोलण्यास सुरुवात केली. संशय येऊ नये म्हणून काही काळ हे संभाषण असेच सुरू ठेवले आणि तरुणीला भेटायला बोलवून पोलिसांनी सापळा रचून तरुणीला बेड्या ठोकल्या.

पोलिसांच्या या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, राहिदास आडे, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, पांढरे, प्रशांत साइद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, स्वाती रुपनवर, वैशाली चांदगुडे, संजय तुंगार, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा - बीड : ठेकेदाराकडून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.