ETV Bharat / state

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आर्मीत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा - Prem Prakrna and murder Sanjay Bhosle news

प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी प्रियकर आणि प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम, असे आरोपींची नावे आहेत.

संजय भोसले
author img

By

Published : Nov 16, 2019, 10:42 AM IST

पुणे- अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी प्रियकर आणि प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम, अशी आरोपींची नावे आहेत. तर, संजय भोसले असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ते भारतीय लष्करात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शीतल आणि योगेशचे गेल्या दोन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. योगेश हा शीतल यांच्या घराच्या समोरच राहत असे. प्रेम प्रकरणात पती संजय हे अडथळा ठरत होते. ते भारतीय लष्करात कार्यरत असल्याने कमीत कमी घरी यायचे. त्यामुळे यांचे प्रेमप्रकरण सुरूच होते. दरम्यान, संजय याना पत्नी शीतल आणि योगेश यांचे प्रेम प्रकरण माहीत झाले. यावरून पत्नी शीतल आणि संजय यांच्यात अनेकदा वाद झाले. त्यामुळे संजय हे दुसरीकडे भाड्याने राहण्यास गेले. परंतु, तिथे देखील संजय हे नोकरीसाठी आसाम येथे गेले असता त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी शीतल आणि योगेश भेटतच राहायचे.

आपल्या प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढायचा, असे पत्नी शीतल आणि योगेशने ठरवले होते. या महिन्यात संजय सुट्टीवर घरी आले. याच दरम्यान रासायनिक कंपनीत कामाला असलेल्या योगेशने शीतलला सोडिअम साइनाईड आणून दिले. रात्री शीतलने पती संजय यांना पाण्याच्या माध्यमातून विषारी सोडियम साइनाईड दिले. त्यामुळे, संजय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शीतल हिने आपला प्रियकर योगेशला बोलवून घेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले.

योगेशने शीतलसह मित्राच्या मदतीने त्यांचा मृतदेह मोटारीत घालून राजगड पोलिसांच्या हद्दीत बेवारस फेकून दिला. परंतु, दुसऱ्याच दिवशी तो मृतदेह राजगड पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या खिशात मोबाईल सापडला. त्यावरून ते लष्करात असल्याचे समजले व त्यांच्या पत्नीशी संपर्क केला गेला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पत्नी शीतलला उलट-सुलट प्रश्न केले असता तिनेच प्रियकर योगेशच्या मदतीने पती संजय यांचा खून केल्याची कबुली दिली. मृत संजय आणि पत्नी शीतल यांना मुलगा आणि मुलगी आहे. त्यामुळे संजय यांच्या हत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर करत आहेत.

हेही वाचा- बारामतीमधील एका शेतकऱ्याची व्यापार्‍यांकडून सव्वा पाच लाखांची फसवणूक

Intro:mh_pun_01_av_love_murder_mhc10002Body:mh_pun_01_av_love_murder_mhc10002

Anchor:- प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी प्रियकर आणि प्रेयसीला अटक करण्यात आली आहे. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम असे आरोपींची नावे आहेत. तर संजय भोसले असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ते भारतीय लष्करात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शीतल आणि योगेशचे गेल्या दोन वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. योगेश हा शीतल यांच्या घराच्या समोरच राहत असे. प्रेम प्रकरणात पती संजय हे अडथळा ठरत होते. ते भारतीय लष्करात कार्यरत असल्याने कमीत कमी घरी यायचे. त्यामुळे यांचं प्रेमप्रकरण सुरूच होते. दरम्यान, संजय याना पत्नी शीतल आणि योगेश यांचे प्रेम प्रकरण माहीत झाले. यावरून पत्नी शीतल आणि मयत झालेले संजय यांच्यात अनेकदा वाद ही झाले. त्यामुळे संजय हे दुसरीकडे भाड्याने राहण्यास गेले. परंतु, तिथे ही संजय हे नोकरीसाठी आसाम येथे गेले असता त्यांच्या पाठीमागे हे दोघे भेटतच राहात.

आपल्या प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढायचा असे पत्नी शीतल आणि योगेश ने ठरवले होते. या महिन्यात संजय सुट्टवर घरी आले. याच दरम्यान रासायनिक कंपनीत कामाला असलेल्या योगेश ने सोडिअम साइनाइड शीतल आणून दिले. ते अत्यंत घातक आणि विषारी आहे. रात्री संजय यांना पत्नी ने शीतल ने पाण्यातून विषारी सोडिअम साइनाइड दिले. संजय यांचा जागीच मृत्यू झाला. प्रियकर योगेश याला बोलवून घेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरले. योगेश ने प्रियसीसह मित्राच्या मदतीने त्यांचा मृतदेह मोटारीत घालून राजगड पोलिसांच्या हद्दीत बेवारस फेकून दिला. परंतु, दुसऱ्याच दिवशी तो मृतदेह राजगड पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्या खिशात मोबाईल सापडला यावरून ते लष्करात असून पत्नीशी संपर्क केला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. दरम्यान, पत्नी शीतल ला उलट सुलट प्रश्न केले असता त्यांनीच प्रियकर योगेश च्या मदतीने पती संजय यांचा खून केल्याची कबुली दिली. मयत संजय आणि पत्नी शीतल यांना दहा, आठ वर्षीय मुलगा आणि मुलगी आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर हे करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.